घरक्रीडाIPL 2021 : बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यावर सगळेच घाबरले; राजस्थानच्या परदेशी खेळाडूचे वक्तव्य

IPL 2021 : बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यावर सगळेच घाबरले; राजस्थानच्या परदेशी खेळाडूचे वक्तव्य

Subscribe

बबलमध्ये काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे कळल्यावर आम्हाला बरेच प्रश्न पडले.

बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करणे भाग पडले. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या वरूण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी सनरायजर्स हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा लेगस्पिनर अमित मिश्रा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बायो-बबलमध्ये असतानाही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे ऐकल्यावर सगळेच घाबरले होते, असे राजस्थान रॉयल्सचा दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू क्रिस मॉरिसने सांगितले. तसेच मॉरिस आता मायदेशी परतला असून १० दिवस त्याला क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

आम्हाला बरेच प्रश्न पडले

मी मायदेशी सुखरूप परत आलो याचे समाधान आहे. भारतातील यंदाचा अनुभव जरा वेगळा होता. बबलमध्ये काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे कळल्यावर आम्हाला बरेच प्रश्न पडले. आम्ही सगळेच थोडे घाबरलो होतो. सोमवारचा सामना (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर स्पर्धा सुरु ठेवायची की स्थगित करायची, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयवर दडपण असणार हे आम्हाला ठाऊक होते, असे मॉरिस म्हणाला.

- Advertisement -

इंग्लंडचे खेळाडू चिंतेत होते

हॉटेलमध्ये आमच्या संघाच्या डॉक्टरांची खोली ही माझ्या खोलीच्या समोरच होती. मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. तितक्यात कुमार संगकारा (राजस्थान संघाचा प्रशिक्षक) तिथे आला आणि आता स्पर्धा स्थगित करावी लागणार असल्याने त्याने खुणेने दर्शवले. त्यानंतर सर्वच जण गोंधळले होते. खासकरून इंग्लंडचे खेळाडू घाबरले होते. त्यांना इंग्लंडमध्ये परतल्यावर हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावे लागणार हे माहित होते. परंतु, इंग्लंडमधील हॉटेल पूर्ण भरलेले असल्याची माहिती होती. त्यामुळे ते चिंतेत होते, असेही मॉरिसने सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -