घरक्रीडाIPL 2022 : RCB ने मुख्य कोचची केली घोषणा; नव्या हंगामाच्या तयारीला...

IPL 2022 : RCB ने मुख्य कोचची केली घोषणा; नव्या हंगामाच्या तयारीला सुरूवात

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे

इंडियन प्रीमियर लीग मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक (coach) म्हणून संजय बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांगर यांची फेब्रुवारीमध्ये बंगळुरूच्या फलंदाजीचे सल्लागार पदी नियुक्ती झाली होती. पण आता त्यांच्या जबाबदारीत वाढ करताना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती केली आहे. ते मावळते प्रशिक्षक माईक हेसन यांच्या जागी संघाच्या प्रशिक्षकपदाचा कारभार पाहतील तर ते आरसीबीच्या संघासाठी पुढील २ वर्ष प्रशिक्षक पद सांभाळतील. हेसन यापुढेदेखील संघाचे क्रिकेट संचालक म्हणून काम पाहणार आहेत. त्यांना नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या हंगामात प्रशिक्षक पदाचा कारभार सोपवला होता पण आता त्यांच्याकडे फक्त संचालक पदाची जबाबदारी असणार आहे.

आरसीबीच्या ट्विटर अकाउंटवरून माहिती देताना हेसन यांनी म्हटले की “आम्ही संजय बांगर यांची पुढील २ वर्षांकरिता आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे”. हेसन यांनी बांगर यांचे कौतुक करताना म्हटले की, “संजय खेळाडूंसोबत आणि स्टाफ सोबत चांगला ताळमेळ ठेवतात आणि त्यांच्याकडे क्रिकेटबद्दल चांगली माहिती आणि अनुभव आहे. जे संघाच्या हिताचे आहे.

- Advertisement -

भारतीय संघाचे माजी क्रिकेटर संजय बांगर यांच्याकडे प्रशिक्षक पदाचा एक चांगला अनुभव आहे. ते २०१४ पासून ५ वर्षांपर्यंत भारतीय संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक राहिले आहेत. तर रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनात संघाला पुढे नेण्यात त्यांनी मदत केली आहे. ४९ वर्षीय बांगर यांनी भारतासाठी १२ कसोटी, १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या संघाच्या प्रशिक्षक पदाचा कारभार सांभाळत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे २०२२ च्या आयपीएलमध्ये विराट कोहली आरसीबीच्या संघाचा कर्णधार नसणार असल्याचे विराटने याआधीच सांगितले होते. अशातच बांगर यांच्यासमोर नवीन खेळाडूंना तयार करणे आणि नवे समीकरण तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: Virat kohli : “…तर आणखी क्रिकेट खेळू शकत नाही’, कर्णधारपदाच्या शेवटच्या सामन्यानंतर कोहलीचे वक्तव्य


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -