घरक्रीडाNasser hussain : भारतीय संघ ICC टूर्नामेंटमध्ये चांगला खेळत नाही; इंग्लंडचा...

Nasser hussain : भारतीय संघ ICC टूर्नामेंटमध्ये चांगला खेळत नाही; इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनचा दावा

Subscribe

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने भारतीय संघाबाबत एक दावा केला आहे

इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने भारतीय संघाबाबत एक दावा केला आहे. त्याने म्हटले की भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कोणत्याच मालिकेत चांगले प्रदर्शन करत नाही. यामध्ये काही योजनांचा अभाव जाणवतो तर संघ निवड समितीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाच्या स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याचे मुख्य कारण आहे. भारताला आपल्या पहिल्या दोन सामन्यांत पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता आणि याच दोन सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघ चालू विश्वचषकातील उपांत्य फेरी गाठू शकला नाही.

हुसैनने सांगितले की “प्रत्येक संघाला मैदानात उतरून व्यक्त व्हायचे असते. भारतीय संघात कोणत्याही प्रतिभेची कमतरता नाही. ही एकमेव गोष्ट असू शकते जी भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये प्रगती करण्यापासून रोखू शकत नाही. भारताने ज्या प्रकारे मुक्तपणे खेळावे तसे ते क्रिकेट खेळत नाहीत कारण भारतीय संघात त्या प्रकारची खेळी करण्याची क्षमता आहे”.

- Advertisement -

भारताचा आपल्या पहिल्या सामन्यांत पाकिस्तानने १० गडी राखून पराभव केला होता. तर पुढच्या सामन्यात न्यूझीलंडने ७ गडी राखून भारतीय संघाचा दारूण पराभव केला होता. रविवारच्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केला त्यामुळे भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले.

“मी भारतीय संघाकडे विश्वचषकातील प्रबळ दावेदार म्हणून पाहत होतो. त्यांनी इथे आयपीएलचे सामने खेळले होते आणि संघात कित्येक स्टार खेळाडू आहेत. भारतीय संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला. पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीने ज्या पध्दतीने पहिल्या काही षटकांत गोलंदाजी केली आणि त्याच्या ज्या २ चेंडूवर रोहित शर्मा आणि के.एल राहुल बाद झाला त्या चेंडूवर कोणतेही दिग्गज फलंदाज बाद होऊ शकतात. कधी-कधी भारतीय संघात अशी समस्या होते की त्यांच्या पहिल्या फळीत एवढे चांगले फलंदाज आहेत की संघातील मधल्या फळीतील फलंदाजांना खेळण्याची जास्त संधीच मिळत नाही. आणि संघाला अचानक पर्यायी व्यवस्थेची गरज असते आणि ती संघाकडे पुरेशा प्रमाणात नसते. असे नासिर हुसैनने आणखी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा T20 WC 2021 : या दोन नावांनी विराट – शास्त्रींना ICC टूर्नामेंटमध्ये हरवण्याची आखली रणनीती

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -