IPL 2022: ‘या’ युवा फिरकीपटूसमोर डेव्हिड वॉर्नरला फलंदाजी करणं होतंय अवघड

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील सामने रोमांचक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयपीएलचा कालचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात लखनऊे ६ गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील सामने रोमांचक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयपीएलचा कालचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात लखनऊे ६ गडी राखून दिल्लीवर विजय मिळवला आहे. दरम्यान, या सामन्याता लखनऊचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोईच्या गोलंदाजीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या सामन्यात बिश्नोईनं तुफानी फलंदाज डेविड वॉर्नरची विकेट घेतली. विशेष म्हणजे रवी बिश्नोईनं डेव्हिड वॉर्नरला तीन वेळा बाद केलं आहे. त्यामुळं रवी बिश्नोई समोर डेविड जास्त काळ टिकत नाही अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात रवी बिश्नोईनं आयपीएलच्या १५ व्या पर्वात प्रथमच खेळत असणाऱ्या डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. डेव्हिड वॉर्नरला १२ चेंडूत केवळ ४ धावा करता आल्या. मात्र डेव्हिडच्या विकेटनंतर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीची चर्ची सर्वत्र रंगली. दरम्यान, दमदार गोलंदाजीच्या जोरावर ४ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या आहेत. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात त्यानं ४ षटकात फक्त २२ धावा देत २ गडी बाद केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ ३ गडी बाद १४९ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्स संघानं ७ षटकांत विकेट न गमावता ५१ धावा केल्या.

टी-२० मालिकांमध्ये डेव्हिड वॉर्नरनं आतापर्यंत १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसंच, टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात रवी बिश्नोईसह आणखी लखनऊचा फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गौतमनंही शानदार गोलंदाजी केली. गौतमनं ४ षटकात २३ धावा देत १ विकेट घेतली. यामध्ये एका मेडन ओव्हरचा समावेश आहे.

दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी ठेवलेल्या १५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सच्या क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock) दमदार खेळ केला. लोकेश राहुलसह त्याने संघाचा पाया मजबूत केला आणि त्यानंतर ८० धावांची खेळी करून लखनौला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन बसवले. पण, अखेरच्या षटकापर्यंत सामन्याची चुरस रंगली. शार्दूल ठाकूरने टाकलेल्या २०व्या षटकात लखनौच्या डग आऊटमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केले होते. पण, अखेर लखनौने बाजी मारली.


हेही वाचा –