घरक्रीडाRCB vs RR : सिराजने 'या' खेळाडूला केली शिवीगाळ, सामन्यानंतर मागितली...

RCB vs RR : सिराजने ‘या’ खेळाडूला केली शिवीगाळ, सामन्यानंतर मागितली माफी; नेमकं काय घडलं?

Subscribe

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रविवारी (23 एप्रिल) राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव करत आयपीएलमध्ये (IPL) शानदार विजय मिळवला. या सामन्यात बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आपल्याच संघातील खेळाडूवर चिडल्याचे पाहायला मिळाले. परंतु, सामन्यानंतर सिराजने त्या खेळाडूची माफीही मागितली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रविवारी (23 एप्रिल) राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव करत आयपीएलमध्ये (IPL) शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना RCBने 20 षटकांत 9 बाद 189 धावा केल्या. ज्यामध्ये फॅफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अनुक्रमे 62 आणि 77 धावा केल्या. प्रत्युत्तरात देवदत्त पडिक्कलच्या 52 धावांच्या शानदार खेळीनंतरही राजस्थान रॉयल्सचा संघ 6 षटकांत केवळ 182 धावाच करू शकला. मात्र या सामन्यात बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आपल्याच संघातील खेळाडूवर चिडल्याचे पाहायला मिळाले. परंतु, सामन्यानंतर सिराजने त्या खेळाडूची माफीही मागितली. (IPL 2023 Mohammed Siraj Got Angry On Mahipal Lomror In Match Against Rajasthan Video Watch)

बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संयम सुटला. सिराज त्याचा सहकारी महिपाल लोमरोरवर चिडला. विशेष म्हणजे सिराजने लोमराला शिवीगाळ केल्याचं वृत्तही समोर आलं. मात्र, या वृत्ताची पुष्टी होऊ शकली नाही. परंतु, दोन्ही खेळाडूंनी सामन्यानंतर आपली खेळी दाखवली आणि चाहत्यांना सांगितले की त्यांच्यात सर्व काही ठीक आहे.

- Advertisement -

नेमके काय घडलं?

राजस्थानला शेवटच्या दोन षटकांत 30 धावा करायच्या होत्या. सिराजने 19व्या षटकात 13 धावा दिल्या. त्याच षटकात त्याच्या पाचव्या चेंडूवर ध्रुव जुरेलने षटकार ठोकला. सहाव्या चेंडूवर ज्युरेलने लाँग ऑनच्या दिशेने चेंडू मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या लोमराकडे चेंडू टाकण्यास थोडा विलंब झाला. यावर सिराजची रनआउट हुकली. त्यानंतर त्याला खूप राग आला आणि त्याने लोमरोरला शिवीगाळ केली.

- Advertisement -

सिराजने माफी मागितली

सामन्यानंतर आरसीबीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सिराज लोमरोरची माफी मागताना दिसत आहे. ”महिपालला मला माफ कर. मी यापूर्वी दोनदा माफी मागितली आहे. मी मैदानाबाहेर आक्रमकता बाळगत नाही. सामना संपल्यानंतर सर्व काही शांत झाले आहे”, असे सिराज म्हणाला. दरम्यान, सिराजने माफी मागितल्यानंतर महिपाल लोमर म्हणाला की, “ठीक आहे सिराज भाई. मोठ्या सामन्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी घडत राहतात”.


हेही वाचा – सचिनने आयुष्यभर ज्या देशाशी पंगा घेतला त्याच देशाने वाढदिवसानिमित्त दिली खास भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -