घरक्रीडाIPL 2024 : बंगळुरूचा IPL 2024मधील पहिला विजय; विराटचे शानदार अर्धशतक

IPL 2024 : बंगळुरूचा IPL 2024मधील पहिला विजय; विराटचे शानदार अर्धशतक

Subscribe

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाबा किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूने आयपीएल 2024मधील पहिला विजय मिळवला. रनमशीन विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूने 4 धावांनी पंजाबवर विजय मिळवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाबा किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात बंगळुरूने आयपीएल 2024मधील पहिला विजय मिळवला. रनमशीन विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूने 4 धावांनी पंजाबवर विजय मिळवला. विराट कोहलीने 49 चेंडूमध्ये 77 धावांचं महत्वाचे योगदान दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 177 धावांचे लक्ष्य बंगळुरूसमोर ठेवले होते. (ipl 2024 rcb vs pbks virat kohli dinesh karthik score rcb first win)

पंजाबने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी तुफानी फलंदाजी केली. परंतू, बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, कॅमरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत आणि रजत पाटीदार यांना मोठी खेळी करता आली नाही. फाफ डु प्लेलिस फक्त तीन धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलही फक्त तीन तीन धावा काढून माघारी परतले. रजत पाटीदार याला चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाटीदार 18 चेंडूत 18 धावांची संथ खेळी केली. या खेळीमध्ये त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. अनुज रावत यानेही संथ फलंदाजी केली. रावत याने 14 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने फक्त 11 धावा केल्या.

- Advertisement -

विराट कोहीलने पुन्हा एकदा धावांचा पाठलाग करताना शानदार खेळी केली. विराट कोहलीने 49 चेंडूमध्ये 77 धावांचं महत्वाचं योगदान दिले. विराट कोहलीने आपल्या खेळीमध्ये दोन षटकार आणि 11 चौकार लगावले. एका बाजूला विकेट पडत असताना विराट कोहलीने दुसऱ्या बाजूने धावसंख्या हालती ठेवली. विराट कोहलीच्या खेळीच्या बळावर आरसीबी विजयाच्या द्वारात पोहचला. दिनेश कार्तिकनं विजयावर शिक्कामोर्तब केले.

विराट कोहली आणि अनुज रावत लागोपाठ बाद झाल्यामुळे आरसीबीचा संघ अडचणीत सापडला होता. पंजाबने सामन्यात कमबॅक केले होते. पण दिनेश कार्तिक आणि लोमरोर यांनी शानदार फलंदाजी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. कार्तिक आणि लोमरोर यांनी सातव्या विकेटसाठी 18 चेंडूमद्ये 48 धावांची भागिदारी केली. लोमरोर यानं 8 चेंडूत 17 धावांचं योगदान दिले तर दिनेश कार्तिकने 10 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिले.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2024 : प्लेऑफ सामने मुंबईत नाही तर या दोन शहरांत; फायनल कुठे पाहा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -