घरक्रीडाअंडर-16 महिला हॉकी लीगला आजपासून सुरुवात; 16 संघ भिडणार

अंडर-16 महिला हॉकी लीगला आजपासून सुरुवात; 16 संघ भिडणार

Subscribe

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता खेलो इंडिया मोहिमेतंर्गत अंडर-16 महिला हॉकी लीग 2022 ला सुरूवात होणार आहे. 16 ऑगस्टपासून (मंगळवार) सुरू होणार असून 16 संघ आमने-सामने येणार आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आता खेलो इंडिया मोहिमेतंर्गत अंडर-16 महिला हॉकी लीग 2022 ला सुरूवात होणार आहे. 16 ऑगस्टपासून (मंगळवार) सुरू होणार असून 16 संघ आमने-सामने येणार आहेत. हे सामने भारताच्या प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये सामन्यांची सुरुवात होणार आहे. खेलो इंडिया अंडर-16 महिला हॉकी लीग 2022 चा पहिला टप्पा 23 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या लीगच्या लीग सामन्यांसाठी संघांची विभागणी दोन पूलमध्ये करण्यात आली आहे. ‘पूल अ’ आणि ‘पूल ब’ असे 2 पूल करण्यात आले आहेत. या लीगमध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला 2 गुण तर सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाणार आहे. तर पराभूत संघांना शून्य गुण मिळतील. या लीगमध्ये यावेळी एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. तर दोन्ही संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हॉकी लीगमध्ये ‘या’ संघांचा सहभाग

भारतीय क्रीडा प्राधिकरण ‘अ’

- Advertisement -
  • भाई बहलो हॉकी अकादमी भगता
  • घुमनहेरा रायझर अकादमी
  • सिटीझन हॉकी इलेव्हन
  • स्मार्ट हॉकी अकादमी रायपूर
  • प्रीतम सिवाच हॉकी अकादमी सोनीपत
  • मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन आणि स्पोर्ट्स हॉस्टेल भुवनेश्वर

भारतीय क्रीडा प्राधिकरण ‘बी’

  • अनंतपूर हॉकी अकादमी
  • एचएआर हॉकी अकादमी
  • दिल्ली हॉकी
  • मध्य प्रदेश हॉकी अकादमी
  • ओडिशा नेव्ही टाटा हॉकी हाय परफॉर्मन्स सेंटर
  • सॅल्यूट हॉकी अकादमी आणि गुजरात क्रीडा प्राधिकरण अकादमी

हेही वाचा – सचिन तेंडुलकरचं स्टेट्स मला माहिती नव्हतं, शोएब अख्तरने सांगितला किस्सा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -