मध्य प्रदेशने रचला इतिहास, पहिल्यांदाच जिंकली रणजी ट्रॉफी; मुंबईचा पराभव

मध्य प्रदेशच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रणजी करंडक २०२१-२२ चे विजेतेपद पटकावले आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेश संघाने मुंबईचा सहा विकेट्स राखून पराभव केला. मध्य प्रदेशने प्रथमच रणजी करंडक जिंकला आहे. याआधी त्यांनी १९९९ मध्ये चंद्रकांत पंडितच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरी गाठली होती. जिथे त्यांचा कर्नाटककडून ९६ धावांनी पराभव झाला होता. चंद्रकांत पंडीत सध्या मध्य प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

मुंबईला दिले १०८ धावांचे लक्ष्य

पाचव्या दिवसाच्या सुरूवातीला सत्रातच मुंबईने आपल्या उर्वरित आठ विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे मुंबईचा दुसरा डाव २६९ धावांवर आटोपला, मुंबईसाठी दुसऱ्या डावात सुवेद पारकरने ५१ धावांचे योगदान दिले. त्याचवेळी संघाकडून सरफराजने ४५ आणि कर्णधार पृथ्वी शॉने ४४ धावा केल्या. मध्य प्रदेशकडून कुमार कार्तिकेयने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. संघाने १०८ धावांचे लक्ष्य सहज गाठले आहे. दुसऱ्या डावात हिमांशू मंत्रीने सर्वाधिक ३७ धावांचे योगदान दिले आहे. दुसरीकडे शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी ३०-३० धावांची खेळी केली.

मुंबईने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या. सरफराज खानने शानदार फलंदाजी करताना १३४ धावांची खेळी केली आहे. यशस्वी जैसवालने ७८ आणि पृथ्वी शॉने ४७ धावांचे योगदान दिले आहेत. मध्य प्रदेश संघाच्या वतीने गौरव यादवला चार आणि अनुभव अग्रवालला तीन वेळा यश मिळालं आहे.

रणजी ट्रॉफीचे शेवटचे पाच विजेते:

2021-22 मध्य प्रदेश
2019-20 सौराष्ट्र
2018-19 विदर्भ
2017-18 विदर्भ
2016-17 गुजरात

मध्य प्रदेश क्रिकेट संघाला २ कोटींचे इनाम

प्रथमच रणजी करंडक पटकावणार्‍या मध्य प्रदेश संघाला मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर यांनी 2 कोटींचे इनाम जाहीर केले. प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना खांडेकर म्हणाले की, सपोर्ट स्टाफलाही इनामाच्या स्वरूपात काही रक्कम देण्याचा आमचा मानस आहे. याबबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. प्रशिक्षक चंदू पंडित यांचे अभिनंदन करून अध्यक्ष खांडेकर म्हणाले की, दुसरी कुठलीही क्रिकेट असोसिएशन (संघटना) पंडित यांना आपल्या सेवेत ओढून घेणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेऊ.

मध्य प्रदेश विजयाचं श्रेय खेळाडू तसेच पदाधिकार्‍यांचे: चंदू पंडित

बंगळुरूः २३ वर्षांपूर्वी याच चिन्नास्वामी स्टेडियमवर माझ्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मध्य प्रदेशला रणजी करंडकाने हुलकावणी दिली होती पण रविवारी दुपारी त्याचठिकाणी मध्य प्रदेश संघाने रणजी करंडक पटकावला मी केवळ खेळाडूंना मार्गदर्शन केले, पण खेळडू प्रमाणेच पडद्यामागे राहून आपली भूमिका चोखपणे पार पाडणारे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे पदधिकारी आणि स्टाफ यांचादेखील या विजयात मोलाचा वाटा आहे असे मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक-मार्गदर्शक चंदू पंडित यांनी सांगितले.

मला खेळाने बरच काही दिलं असून मलादेखील खेळाला परत काही द्ययच आहे या भावनेने मी माझी भूमिका बजावतो,त्यात अनोखा आनंद मिळतो. गुरू रमाकांत आचरेकर सर, अशोक मंकड, पॉली उम्रिगर यांची आठवण काढत चंदूने या महान खेळाडूना यशाचे श्रेय दिलं माझी भूमिका चोखपणे बजावली अन् ती परिपूर्ण झाल्यामुळे बरं वाटते असंही त्याने नम्रपणे नमूद केले. खेलाडूंनी मेहनत केली कर्णधार आदित्य श्रीवास्तव तर सतत संपर्कत असायचा त्याची ही वृत्ती चांगलीच अन् त्याचा फायदा संघाला झाला. माजी खेळाडू संजय जगदाळे यांचीदेखिल आठवण त्याने काढली .

कर्णधार आदित्य श्रीवास्तवने पंडित सरांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हे यश लाभले असं अभिमानाने सांगितले. त्यांची शिस्त कडक पण त्याचा परिणाम मोसमाच्या अखेरीस दिसून आला आम्ही घेतलेल्या मेहनतिचं चीज झालं असं मध्य प्रदेश कर्णधाराने सांगितलं.

मुंबईचे नूतन प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी मुंबईचे क्रिकेट (लाल चेंडूने खेळले जाणारे प्रथम श्रेणी क्रिकेट परत रुळावर येत असल्याच नमूद केले आणि या संघातील नौजवान खेलाडूकडून उमेद बाळगता येईल असे नमूद केले.

तिसर्‍या दिवशी आमच्या खेळात मनाजोगती कामगिरी झाली नाही त्यामुळे पकड ढीली पडली पण पारकर जयस्वाल सर्फराज अरमान मुलानी या युवा खेळाडूंची त्यांनी तारीफ केली मुबई क्रिकेट च भविष्य उज्ज्वल आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.


हेही वाचा : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण