घरक्रीडाकॅरम विश्वातील पहिले स्कोअरबोर्ड अ‍ॅप; महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची अनोखी निर्मिती 

कॅरम विश्वातील पहिले स्कोअरबोर्ड अ‍ॅप; महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची अनोखी निर्मिती 

Subscribe

एम. सी. ए. कॅरम स्कोअरबोर्ड असे या अ‍ॅपचे नाव असून अँड्रॉइड मोबाईल धारक कॅरम आणि क्रीडा रसिकांना प्ले-स्टोअरवरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने विश्वातील पहिल्या कॅरम स्कोअरबोर्ड अ‍ॅपची निर्मिती केली आहे. एम. सी. ए. कॅरम स्कोअरबोर्ड असे या अ‍ॅपचे नाव असून अँड्रॉइड मोबाईल धारक कॅरम आणि क्रीडा रसिकांना प्ले-स्टोअरवरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन गेली ९ वर्षे सातत्याने कॅरमचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार व प्रसार व्हावा यासाठी काम करत आहे. सर्व स्तरावर या खेळाला मान्यता मिळावी म्हणून त्यांचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने २०१३ साली प्रथम स्वतःच्या वेबसाईटची निर्मिती करून त्यावर कॅरमचा इतिहास व इतर माहिती उपलब्ध करून दिली. त्यानंतर स्वतःचे युट्युब चॅनल तयार करून कॅरमचे लाईव्ह सामने दाखवून हा खेळ रसिकांपर्यंत पोहोचवला. आज जवळपास १५०० पेक्षाही जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडूंचे सामने या युट्युब चॅनलवर रसिकांसाठी उपलब्ध आहेत.

- Advertisement -

आता महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने पहिल्या कॅरम स्कोअरबोर्ड अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपमध्ये खेळाडूंची नावे लिहिता येत असून सेट, स्कोअर व बोर्ड क्रमांक टाकण्याची सुविधा उपलब्ध आहे. स्पर्धेचे सामने असो किंवा सराव असो, हा स्कोअरबोर्ड विनामूल्य उपलब्ध करण्यात आला आहे. कॅरमचे चाहते अतिशय सहजपणे हा स्कोअरबोर्ड हाताळू शकतील याची काळजी अ‍ॅप निर्मिती करताना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -