घरक्रीडामीराबाई चानू वर्ल्ड आणि कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाही; कोच विजय शर्मा...

मीराबाई चानू वर्ल्ड आणि कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाही; कोच विजय शर्मा यांचा सल्ला

Subscribe

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी मीराबाई चानू वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ सिनियर चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाही

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून देणारी मीराबाई चानू वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ सिनियर चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाही. तिने भारतीय प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या सल्ल्यानुसार या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दोन्हीही चॅम्पियनशिपच्या स्पर्धा ७ डिसेंबर दरम्यान ताक्तेन आणि उजबेकिस्तानमध्ये एकावेळी आयोजित केल्या जाणार आहेत. तर चानूने ४९ किलो ग्रॅममध्ये पदक जिंकले होते. भारतीय प्रशिक्षक विजय शर्मा यांचा या दोन्हीही स्पर्धेमध्ये खेळांडूना सहभागी करण्याचा मुख्य हेतू म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या कॉमनवेल्थ खेळांसाठी त्यांना पात्रता फेरी गाठता यावी.

प्रशिक्षक विजय शर्मा यांनी म्हटले की, “आम्ही मीराचे नाव पहिले पाठवले होते. मात्र आता तिचे प्रदर्शन चांगले नाही, आम्ही तिच्या नियोजन पध्दतीवर काम करत आहे. मीरा कॉमनवेल्थसाठी पहिल्यापासून योग्य आहे. कारण तिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते आणि काही काळ ती क्रमवारीत पहिल्या स्थानावर देखील राहिले आहे”.

- Advertisement -

कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपचे आयोजन पहिले सिंगापूरमध्ये २० ते २४ ऑक्टोबरदरम्यान होणार होते. पण कोरोनामुळे तिथून रद्द करण्यात आले आणि आता ही स्पर्धा वर्ल्ड चॅम्पियनशिपसोबत पुढच्या महिन्यात आयोजित केली आहे.

भारताचे २० खेळाडू होणार सहभागी

कॉमनवेल्थ सीनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताचे २० खेळाडू सहभागी होणार आहेत. युथ ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या जेरेमी लालरिनुंगाकडून पुन्हा एकदा मोठी अपेक्षा असेल. ४९ किलो वजनी गटात ११९ किलो वजन उचलून भारताचा विश्वविक्रम करणाऱ्या चानूला स्नॅचमध्ये चीनच्या खेळाडूसमोर संघर्ष करावा लागला होता. तोल सावरल्याने त्याच्या उजव्या खांद्यावर आणि कमरेला दुखापत झाली. तिने डॉ. अॅरॉन हॉर्शिंग यांच्याशीही चर्चा केली आहे, ज्यांनी यापूर्वी त्याला रौप्य पदक जिंकण्यास मदत केली होती. मात्र ती पुन्हा प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जाणार नाही.

- Advertisement -

हे ही वाचा: R Ashwin : अश्विनने एका दशकात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉडसारख्या दिग्गज खेळाडूंना टाकले मागे


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -