घरक्रीडाबँक ऑफ बडोदाद्याला (देना बँक) जेतेपद

बँक ऑफ बडोदाद्याला (देना बँक) जेतेपद

Subscribe

मुंबई शहर निवड चाचणी कबड्डी

बँक ऑफ बडोदा (देना बँक), एअर इंडिया या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अनुक्रमे महिला व्यावसायिक आणि पुरुष विशेष व्यावसायिक गटाचे जेतेपद पटकावले. महिला गटात शिवशक्ती मंडळ, तर प्रथम श्रेणी पुरुषांत जय भारत क्रीडा मंडळ विजेते ठरले.

नायगाव येथील भारतीय क्रीडा क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या महिला व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदा (देना बँक) स्पोर्ट्सने जे.जे. रुग्णालयाचा २६-५ असा धुव्वा उडवत या गटाचे जेतेपद मिळवले. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच बँकेने वर्चस्व प्रस्थापित करत मध्यंतराला २२-४ अशी मोठी आघाडी घेतली. त्यांच्या या विजयात साक्षी रहाटे, पौर्णिमा जेधे या खेळाडू चमकल्या.

- Advertisement -

विशेष व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने बँक ऑफ बडोदा (देना बँक) संघाला ३७-१३ असे पराभूत करत स्व. शंकरराव (बुवा) साळवी स्मृती चषकावर आपले नाव कोरले. एअर इंडियाने पहिल्या डावात २२-४ आघाडी घेत विजयाचा पाया रचला. दुसर्‍या डावात त्यांनी आणखी १५ गुण वसूल करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नवनाथ जाधव, आकाश कदम यांच्या चढाया आणि साईराज कुंभारच्या भक्कम बचावाला या विजयाचे श्रेय जाते.

प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात जय भारत क्रीडा मंडळाने अंकुर स्पोर्ट्सला २५-२२ असे पराभूत करत स्व. राजाराम पवार स्मृती चषक पटकावला. या सामन्याच्या सुरुवातीला जय भारतला चांगला खेळ करण्यात अपयश आले. त्यामुळे मध्यंतराला हा संघ १०-१३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र, उत्तरार्धात ओमकार मोरे, अक्षय जाधव, अविनाश कावीलकर यांच्या दमदार खेळामुळे जय भारतने पुनरागमन करत हा सामना २५-२२ असा जिंकला.

- Advertisement -

महिलांत शिवशक्ती अ विजयी

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला अ संघाने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सचा ५१-१८ असा पराभव करत स्व. प्रभाकर (दादा) अमृते स्मृती चषकावर आपले नाव कोरले. शिवशक्तीने विश्रांतीला २३-१२ आघाडी घेतली. विश्रांतीनंतर त्यांनी अधिकच आक्रमक खेळ करत हा सामना जिंकला. पूजा यादव, ऋणाली भुवड यांच्या चढाया, तर साधना विश्वकर्मा, आरती पाटील यांच्या भक्कम पकडीला शिवशक्तीच्या विजयाचे श्रेय जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -