घरक्रीडा'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने रचला नवा इतिहास; डायमंड लीग स्पर्धेत पटकावले विजेतेपद

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने रचला नवा इतिहास; डायमंड लीग स्पर्धेत पटकावले विजेतेपद

Subscribe

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने दुखापतीतून सावरत दमदार पुनरागमन केले आहे. भालाफेकपटू नीरजने ऐतिहासिक डायमंड लीग स्पर्धेत शुक्रवारी 89.08 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजेतेपदाला गवसणी घातली आहे. हे विजेतेपद पटकावणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. या विजेतेपदासह नीरजने झुरिच येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नीरजने अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८८.१३ मीटर फेक करून ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. ज्यात खेळताना त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. मात्र दोन ते तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नीरजने दमदार पुनरागमन करत अनेकांची मनं जिंकली आहेत.

इतकेच नाही तर हंगेरीतील बुडापोस्ट येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 साठीही तो पात्र ठरला आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक केला. ज्यापर्यंत इतर खेळाडूंना स्पर्श करणे कठीण आहे. यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 85.18 मीटर भालाफेक केली यानंतर त्यानंतर त्यानं तिसरा थ्रो केलाच नाही. त्यानंतर चोप्राचा चौथा प्रयत्न फाऊल घोषित झाला आणि नंतर त्याने पाचव्या प्रयत्न देखील केला नाही. त्यामुळे पहिल्या थ्रोच्या बळावर नीरजला विजयी घोषित करण्यात आलं.

- Advertisement -

अंतिम थ्रोमध्ये नीरज चोप्राने 80.04 मीटरचे लक्ष्य गाठले. लॉस डायमंड लीगमध्ये टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता जेकब वडलेज 85.88 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान मिळवले तर यूएसएच्या कर्टिस थॉम्पसनने 83.72 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह तिसरे स्थान मिळविले.

- Advertisement -

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती. नुकत्याच झालेल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेला त्याला खेळता आले नाही. वैद्यकीय पथकाने नीरज चोप्राला चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला. यात यूएसमध्ये नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत भारताचे नाव मोठे केले.

नीरज चोप्राने वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल 19 वर्षांनी हे पदक भारताला जिंकून दिले आहे. मात्र या स्पर्धेत त्याला दुखापत झाल्याने त्याला एक महिना मैदानापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे बर्मिंगहम येथे  कॉमनवेल्थ स्पर्धेत त्याला खेळण्यापासून मुकावे लागले.


भारतीय संघाचा झिम्बाब्वेवर व्हाइटवॉश, एकदिवसीय मालिकेत शुबमन गिल ठरला हीरो

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -