घरक्रीडानोव्हाक जोकोविच ठरला ऑस्ट्रेलियन ओपनचा बादशाह, दहाव्यांदा पटकावले जेतेपद

नोव्हाक जोकोविच ठरला ऑस्ट्रेलियन ओपनचा बादशाह, दहाव्यांदा पटकावले जेतेपद

Subscribe

स्टार खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले आहे. जोकोविचने स्टिफनोसला 6-3,7-4 आणि 7-6 च्या सेटमध्ये पराभूत केले. विशेष म्हणजे यासोबत त्याने स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालच्या ग्रँडस्लॅमच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता जोकोविचकडील ग्रँडस्लॅमची संख्या 22 झाली आहे. तसेच नोवाक जोकोविचचे हे 10वे ऑस्ट्रेलिया ओपनचे जेतेपद असून नदालनेही 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. या विजेतेपदासह जोकोविच जगातील नंबर वन खेळाडू बनला आहे.

- Advertisement -

जोकोविचने 10व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल खेळली. याआधी जोकोविचने नऊ वेळा या ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे आणि प्रत्येक वेळी विजेतेपद पटकावले आहे.

मागील वर्षी मुकला होता ऑस्ट्रेलिया ओपनला

- Advertisement -

2021 मध्ये नोवाकनं ऑस्ट्रेलिया ओपनचं जेतेपद पटकावलं होतं. पण कोविड प्रोटोकॉलमुळे 2022 च्या सीझनमध्ये तो खेळू शकला नाही. स्पर्धेच्या आयोजकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लसीकरण अनिवार्य केलं होते, तर नोव्हाकला लसीकरणासंबंधीची माहिती सार्वजनिक करायची नव्हती. त्यामुळे तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन खेळू शकला नव्हता. तसंच आजच्या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, चौथ्या मानांकित नोवाकनं ग्रीसच्या त्सित्सिपासचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

जोकोविचने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. यानंतर सर्बियन स्टार नोवाकला दुसरा आणि तिसरा सेट जिंकण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. हे दोन्ही सेट टायब्रेकरमध्ये गेले, जोकोविचने दुसरा सेट 7(7)-6(4) ने जिंकला. त्यानंतर तिसरा सेट 7(7)-6(5) ने जिंकला.

पुरुष एकेरीची सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम जिंकणारे पुरुष खेळाडू

22- नोव्हाक जोकोविच

22- राफेल नदाल

20- रॉजर फेडरर

14- पीट सॅंम्प्रास


हेही वाचा : भारताचा इंग्लंडवर मोठा विजय, विश्वचषकावर कोरलं नाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -