घरक्रीडायाच दिवशी २०१२ मध्ये, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रचलेला अनोखा विक्रम!

याच दिवशी २०१२ मध्ये, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रचलेला अनोखा विक्रम!

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके असे अनेक विक्रम सचिनच्या नावे आहेत.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने, सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके असे अनेक विक्रम सचिनच्या नावे आहेत. २०१२ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याने एका अनोख्या आणि अविश्वसनीय विक्रमाला गवसणी घातली. १६ मार्च २०१२ ला झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सचिनने शतकी खेळी केली होती. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० वे शतक ठरले. सचिनने २०११ वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले ९९ वे शतक झळकावले होते. त्यानंतर १०० वे शतक करण्यासाठी त्याला एका वर्षाहूनही जास्त काळ वाट पाहावी लागली होती.

११४ धावांची खेळी केली

अखेर सचिनने १६ मार्च २०१२ ला झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे १०० वे शतक झळकावले. त्याने या सामन्यात १४७ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११४ धावांची खेळी केली होती. त्याच्या या शतकामुळे भारताने ५० षटकांत ५ बाद २८९ अशी धावसंख्या उभारली. बांगलादेशने २९० धावांचे लक्ष्य ५ विकेट राखून गाठत हा सामना जिंकला होता.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरचे शतक

सचिनसाठी हा सामना मात्र खास ठरला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करताना एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ वे आणि अखेरचे शतक केले. त्याने एकूण एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९, तर कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके केली. सचिन नोव्हेंबर २०१३ मध्ये सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -