घरक्रीडानामदार चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रयाग भाटीचे आक्रमक शतक

नामदार चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रयाग भाटीचे आक्रमक शतक

Subscribe

नामदार चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लबने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा ९० धावांनी दणदणीत पराभव केला. प्रयाग भाटीची आक्रमक शतकी खेळी आणि प्रतीक वारंगने गोलंदाजीत दिलेल्या तेवढ्याच तोलामोलाच्या साथीमुळे युनियन क्रिकेट क्लबने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला.

नामदार चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत युनियन क्रिकेट क्लबने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा ९० धावांनी दणदणीत पराभव केला. प्रयाग भाटीची आक्रमक शतकी खेळी आणि प्रतीक वारंगने गोलंदाजीत दिलेल्या तेवढ्याच तोलामोलाच्या साथीमुळे युनियन क्रिकेट क्लबने साळगावकर स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला. नामदार चषक टिपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्र माझा सेवा संस्थेकडून आयोजित करण्यात आली होती.

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात प्रयाग भाटीने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी अक्षरशः घाम गाळायला लावला. प्रयागने ४८ चेंडूत १० चौकार आणि ९ षटकार ठोकत संघाच्या एकूण धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.

- Advertisement -

प्रयागच्या ११६ आणि आकाश पारकरच्या नाबाद ५२ आणि सागर मिश्राच्या ३१ धावांमुळे युनियन क्रिकेट क्लबने २० षटकात ५ बाद २६४ धावांचे आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभे केले. साळगावकर स्पोर्ट्स क्लबकडून कर्ष कोठारीने ३६ धावांत २ आणि दिनेश ठाकुर, प्रणव टिल्लू, चेतन पाटीलने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना सम्राट नाखवा आणि परेश घाणेकरने धडाकेबाज सुरुवात केली. पण या दोघांचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मात्र विजयी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. साळगावकर स्पोर्ट्स क्लबला २० षटकात ५ बाद १७४ धावा केल्या.

- Advertisement -

परेशने एक चौकार आणि सात षटकारासह नाबाद ७१ धावा केल्या. तर सम्राटने सात चौकारासह ४५ धावा केल्या. प्रतीक वारंगने ३२ धावांत ३ आणि ऋषि नारंग, आकाश पारकरने प्रत्येकी एक विकेट मिळवली. प्रयागला सामन्यातील स्टार खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


हेही वाचा – पृथ्वी शॉचं मुंबईतील अलिशान घर पाहिलत का? किंमत वाचून व्हाल थक्क

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -