घरक्रीडाभारतीय संघात खेळण्यासाठी पृथ्वी शॉ तयार; सौरव गांगुलीची माहिती

भारतीय संघात खेळण्यासाठी पृथ्वी शॉ तयार; सौरव गांगुलीची माहिती

Subscribe

पृथ्वी शॉ भारतीय संघात खेळण्यासाठी आता योग्यरीत्या तयार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.

खराब फॉर्ममुळे मागील अनेक काळापासून भारतीय संघापासून लांब असलेला सलामीवीर पृथ्वी शॉबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पृथ्वी शॉ भारतीय संघात खेळण्यासाठी आता योग्यरीत्या तयार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली. (Prithvi Shaw is fully ready to play for the Indian team said Former BCCI president Sourav Ganguly)

नेमकं काय म्हणाला सौरव गांगुली?

- Advertisement -

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “पृथ्वी शॉ भारताकडून खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्याला संधी मिळणार की नाही हे निवड समितीवर अवलंबून आहे. मला खात्री आहे की रोहित शर्मा आणि निवडकर्ते त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. तो एक चांगला खेळाडू आहे आणि आता पूर्णपणे तयार आहे”, असे गांगुली म्हणाला.

पृथ्वी शॉने भारताकडून शेवटचा सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. तसेच, येत्या 31 मार्चपासू सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून पृथ्वी शॉ खेळताना दिसणार आहे. त्यामुळे आता पृथ्वी या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघाच पुनरागमन करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यामुळे आता पृथ्वी थेट आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मागील काही पर्वात पृथ्वी शॉने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना शानदार कामगिरी केली. दिल्ली संघाकडून सलामीवीर म्हणून सुरुवात करताना त्याने संघासाठी अनेक स्फोटक खेळी खेळल्या.

आयपीएल 2021 हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्व ठरले होते. त्यादरम्यान पृथ्वी शॉने 15 सामन्यात 31.93 च्या सरासरीने 479 धावा केल्या. कर्णधार रिषभ पंतच्या गैरहजेरीत डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची धुरा सांभाळणार आहे.


हेही वाचा – क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यात सापडले, पोलिसांनी काही तासांत घेतला शोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -