Ranji trophy : रवी शास्त्रींनी बीसीसीआयला फटकारले, म्हणाले असे केल्यास क्रिकेट कमकुवत..

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत काम कलेले संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या चर्चेत आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडल्यानंतर रवी शास्त्री मुलाखती देत असल्यामुळे ते चर्चेत असतात. सध्या ते कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत आले नाही आहेत. तर एका ट्विटमुळे त्यांच्या नावाची पुन्हा चर्चा करण्यात येत आहे. बीसीसीआय देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धेतबाबत रवी शास्त्रींनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शुक्रावारी घोषणा केली की, पुढे ढकलण्यात आलेली देशांतर्गत रणजी ट्रॉफी पुढील महिन्यापासून दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे रणजी ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार ३८ संघांची ही स्पर्धा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होणार असून पहिला टप्पा महिनाभर चालणार आहे. या स्पर्धेचे आयोजन १३ जानेवारीपासून करायचे होते परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे स्थगित करण्यात आले होते.

बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले की, बोर्डाने रणजी करंडक दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या ट्प्प्यात लीग स्तरीय सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. यानंतर बाद फेरीचे सामने जूनमध्ये घेण्यात येतील. साथीच्या आजारामुळे आरोग्याच्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी टीम तयारी करत आहे. पहिला टप्पा आयपीएलपूर्वी असेल तर त्यानंतर काही सामने खेळवण्यात येतील.

या सर्व सामन्यांच्या आयोजनावर माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रणजी ट्रॉफी दोन टप्प्यात आयोजित करण्यात आल्याचा बीसीसीआयचा निर्णय आवडला नाही. मंडळाने प्रतिष्ठेच्या स्पर्धेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रवी शास्त्रींनी ट्विट केले आहे की, रणजी ट्रॉफी हा भारतीय क्रिकेटचा कणा आहे. ज्या क्षणी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कराल तेव्हा आपलं क्रिकेट कमकुवत होईल. अशा शब्दात रवी शास्त्री यांनी बीसीसीआयला फटकारले आहे.


हेही वाचा : Shoaib Akhtar : तर सचिन तेंडुलकरच्या १ लाखपेक्षा जास्त धावा असत्या, शोएब अख्तरचे मोठं विधान