घरक्रीडाटी-२० विश्वचषकात भारतीय संघाला धक्का, 'हा' खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला धक्का, ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर

Subscribe

आशिया चषक २०२२ या स्पर्धेनंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा आगामी महिन्यातील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पार पडणार आहे. परंतु या स्पर्धेतून भारतीय संघाचा एक खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे दोन खेळाडूंनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्यामुळे त्यांची जागा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे.

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. या विश्वचषकासाठी त्यांचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. परंतु दुखापतग्रस्त अष्टपैलू रवींद्र जडेजा आता वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आता त्याचे यशस्वी ऑपरेशनदेखील झाले. मात्र, या शस्त्रक्रियेतून जडेजा रिकव्हर होण्याची शक्यता कमी प्रमाणात वर्तवली जात आहे. त्यामुळे तो टी-२० स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. हा भारतीय संघाला मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, जडेजाऐवजी अष्टपैलू अक्षर पटेलच्या नावाला पहिली पसंती दिली जात आहे. अक्षरने याआधी सुद्धा २०१५ चा विश्वचषकही खेळला होता.

- Advertisement -

हेही वाचा : आशिया जेतेपदासाठी श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आज अंतिम लढत, कोणता संघ बाजी मारणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -