घरक्रीडाभारत आणि पाकिस्तान आज पुन्हा भिडणार, पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11 टीम?

भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा भिडणार, पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग 11 टीम?

Subscribe

आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आठ दिवसानंतर दोन्ही संघ दुसऱ्यांदा समोर येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 फेरीतील हा पहिला सामना आहे. याआधीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहाणी हाताच्या दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडला. शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियरनंतर टूर्नामेंटमधून बाहेर पडणारा दहाणी हा पाकिस्तानचा तिसरा वेगवान गोलंदाज आहे. आता तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला नसीम शाह आणि हरिस रौफ यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे

- Advertisement -

पाकिस्तानने संघात शाहीन शाह आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनची निवड केली आहे. याशिवाय अनुभवी गोलंदाज हसन अली हा सुद्धा पाकिस्तानच्या संघाचा भाग आहे. कर्णधार बाबर आझम प्लेइंग 11 मध्ये या दोनपैकी एका गोलंदाजाला संधी देऊ शकतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. भारताने 2016 मध्ये पाकिस्तानचा पाच विकेटने पराभव केला होता. यानंतर 2018 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या सामन्यात 8 गडी राखून आणि दुसऱ्या सामन्यात नऊ विकेट्स राखून पराभव केला होता.

- Advertisement -

दोन्ही उभय संघाची संभाव्य टीम – 

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.


हेही वाचा : भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने; भारतीय संघाला उत्तम खेळीची गरज


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -