घरक्रीडाIPL 2022 : आयपीएलच्या लिलावासाठी श्रीसंत सज्ज, इतकी ठेवली बेस प्राइस

IPL 2022 : आयपीएलच्या लिलावासाठी श्रीसंत सज्ज, इतकी ठेवली बेस प्राइस

Subscribe

भारतीय गोलंदाज एस. श्रीसंत आयपीएलमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा एकदा खेळण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. आयपीएलच्या लिलावाला १२ आणि १३ फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे श्रीसंतने आपल्या नावाची नोंदणी केली आहे. आयपीएल २०२१ मध्ये लिलावासाठी श्रीसंतने आपल्या नावाची नोंदणि केली होती. परंतु अंतिम यादीमध्ये त्याच्या नावाचा सहभाग नव्हता. श्रीसंत २०१३ मध्ये शेवटच्या वेळी राजस्थान संघाकडून खेळला होता.

आयपीएल २०२२ च्या लिलावासाठी श्रीसंतने आपली बेस प्राइस ५० लाख रूपये ठेवली असल्याची माहिती मिळाली आहे. मागील वर्षात त्याने आपली बेस प्राइज ७५ लाख रूपये ठेवली होती. ३८ वर्षांच्या या गोलंदाजाला केरळच्या संघासोबत यंदाच्या वर्षात रणडी ट्रॉफीमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही ट्रॉफी स्थगित करण्यात आली होती.

- Advertisement -

श्रीसंतने यावर्षी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघासाठी पांढऱ्या चेंडूचे सामने खेळले नाहीत. २०२०-२१ च्या हंगामात तो केरळ संघामधून शेवटचा क्रिकेट खेळला होता.

पंजाब किंग्ज आणि कोच्ची टस्कर्स केरळसाठी खेळणाऱ्या श्रीसंतने टी-२० लीगच्या ४४ सामन्यांत एकूण ४० विकेट्स घेतले आहेत. टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या श्रीसंतने २००७ साली १० सामन्यांमध्ये एकूण ७ विकेट्स घेतल्या आहेत. टी-२० सामन्यांमधील ६५ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत एकूण ५४ विकेट्स घेतल्या आहेत. ४९ खेळाडूंनी लिलावासाठी आपली मूळ किंमत २ कोटी रूपये ठेवली आहे. तसेच यामध्ये १७ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, आयपीएलचे सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांत करण्याबाबत बीसीसीआयची आग्रही भूमिका आहे. या दोन शहरांत ४ मैदाने जवळ-जवळ असल्यामुळे आयोजन करण्यात अधिक सोयीचे होईल. मुंबईत वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि डीवाय पाटील स्टेडियम तसेच पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियममध्ये सामने होऊ शकतात.


हेही वाचा : Beating Retreat: महात्मा गांधींच्या आवडत्या प्रार्थनेच्या सूराला बिटिंग द रिट्रीट कार्यक्रमातून वगळलं, काँग्रेस आक्रमक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -