घरक्रीडा'सचिन.. सचिन..!' या नाऱ्याची सुरुवात कुणी केली? ऐका सचिन काय म्हणतो

‘सचिन.. सचिन..!’ या नाऱ्याची सुरुवात कुणी केली? ऐका सचिन काय म्हणतो

Subscribe

सचिन तेंडुलकर भारतात किंवा भारताबाहेर कुठेही खेळत असला तरी मैदानात एक नारा हमखास घुमायचा. तो म्हणजे ‘सचिन.. सचिन..!’ एकसुरात सर्व प्रेक्षक सचिन.. सचिनचा नारा द्यायचे. आजही अनेकांना हा नारा लक्षात असेल. मात्र सर्वात पहिल्यांदा हा नारा कुणी दिला असेल? या नाऱ्याची सुरुवात कशी झाली असेल? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आता खुद्द सचिनचेच याचे उत्तर दिले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिनने याबद्दल नुकताच खुलासा केला आहे. ज्या व्यक्तीने या नाऱ्याची सुरुवात केली, त्याचे नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या मुलाखतीत बोलत असताना सचिन म्हणाला की, माझ्या आईने याची सुरुवात केली होती. मी जेव्हा पाच वर्षाचा होतो, तेव्हा आमच्या सोसायटीच्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळायचो. जेव्हा संध्याकाळी उशीरापर्यंत मी खेळत राहायचो. तेव्हा आई बालकनीतून ‘सचिन, सचिन’ असा हाका मारून मला वर बोलवायची. तेव्हापासून अशापद्धतीने मला आवाज द्यायची सुरुवात झाली.

- Advertisement -

सचिनने या मुलाखतीत पुढे सांगितले की, “मी मैदानात खेळत असताना कधीही स्वतःचे रन्स मोजायचो नाही. मी थोडासा अंधश्रद्धाळू असल्या कारणाने रन मोजल्यानंतर ते आपल्याकडे येत नाही, अशी माझी धारणा होती. तसाच प्रकार सचिन, सचिन या हाकेचा आहे. मी त्याकडे लक्ष देत नाही. मात्र मैदानात असा आवाज घुमत असतानाचा आवाज अविस्मरणीय असा होता. त्याचा सुखद अनुभव मी घेतलाय. त्याबद्दल लोकांचे कितीही आभार मानले तरी ते पुरेसे ठरणार नाहीत.”

सचिनचा शेवटचा सामना पाहायला त्याची आई मैदानात आली होती. याबद्दल सांगताना सचिन म्हणाला की, तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण होता. शेवटच्या सामन्याबाबत बोलताना मला शब्द सुचत नाहीत. माझ्या कारकिर्दीत आई एकदाही सामना पाहायला आली नव्हती. शेवटच्या सामन्यात मी किती रन्स केले, हे आता माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. माझी आई माझा सामना पाहायला मैदानात आली होती, हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -