घरक्रीडाIPL 2022 : श्रेयश अय्यर दिल्लीची साथ सोडणार; जाणून घ्या कारण

IPL 2022 : श्रेयश अय्यर दिल्लीची साथ सोडणार; जाणून घ्या कारण

Subscribe

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून कर्णधार राहिलेला श्रेयश अय्यर २०२२ मध्ये संघातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून कर्णधार राहिलेला श्रेयश अय्यर २०२२ मध्ये संघातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. २०१५ च्या आयपीएल मध्ये पदार्पण करणारा श्रेयश अय्यर दिल्लीच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. या संघातर्फे खेळताना त्याने खूप चांगली फलंदाजी केली होती. सोबतच एक चांगला कर्णधार म्हणून ओळख देखील मिळवली होती. आयपीएल २०१८ मध्ये जेव्हा गौतम गंभीरने हंगामाच्या अर्ध्यातूनच संघाचे कर्णधार पद सोडले होते, तेव्हा श्रेयशला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. त्याच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात दिल्लीच्या संघाने २ वेळा प्ले-ऑफ मध्ये प्रवेश केला होता त्यात २०२० च्या अंतिम फेरीचा समावेश आहे.

अशातच २०२१ च्या हंगामा अगोदरच त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे रिषभ पंतला चालू हंगामासाठी संघाचा कर्णधार बनवला होता. यानंतर तो फीट होऊन यूएईत झालेल्या आयपीएलच्या दुसऱ्या चरणात संघात सामिल झाला होता पण यावेळी त्याला दुसऱ्यांदा संघाचा कर्णधार बनवले नव्हते. तर २०२१ मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीच्या संघाने प्ले-ऑफ मध्ये प्रवेश मिळवला होता, त्यामुळे श्रेयश अय्यरकडे पुन्हा दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कदाचित याच कारणास्तव श्रेयश अय्यर दिल्लीच्या संघाची साथ सोडू शकतो. माहितीनुसार तो कर्णधार पदासाठी इच्छुक आहे आणि म्हणूनच तो आयपीएल २०२२ च्या लिलावात उतरणार आहे.

- Advertisement -

श्रेयश अय्यर यूएईतील आयपीएल २०२१ चा हंगाम संपल्यानंतर भारतीय संघासोबत दुबईत स्थित आहे, टी २० २०२१ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून त्याचा समावेश आहे. २०२२ च्या आयपीएल मध्ये एकूण १० संघ असणार आहेत. हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ अशा २ नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे. लिलावात सहभागी झाल्यानंतर तो यातील कोणत्याही नवीन संघात सामिल होऊ शकतो आणि त्या संघाचे कर्णधार पद देखील भूषवू शकतो.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -