घरमहाराष्ट्रनाशिक मराठी साहित्य संमेलनात उलगडणार महाराजा सयाजीराव गायकवाडांचा जीवनप्रवास

 मराठी साहित्य संमेलनात उलगडणार महाराजा सयाजीराव गायकवाडांचा जीवनप्रवास

Subscribe

 20 हजार पानांच्या 50 ग्रंथांचं होणार प्रकाशन

नाशिकमध्ये ३ ते ५ डिसेंबरदरम्यान होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जीवनप्रवासही उलगडणार आहे. ४ डिसेंबला प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांच्या मुलाखतीनंतर ‘प्रकाशन कट्टा’वर सयाजीरावांसंदर्भातल्या 50 ग्रंथांचं प्रकाशन होईल.

त्यासाठी बडोद्याच्या राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड या स्वतः उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधन प्रकाशन समितीच्या अध्यक्षांचीही उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचं ठिकाण बदलल्यानं शहरातल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या एका सभागृहात सोमवारपासून अतिरिक्त कार्यालय सुरू होणार आहे.

- Advertisement -

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -