लैंगिक अत्याचारानंतर पेंग शुईचा ईमेल सुरक्षेबद्दल चिंता वाढवतो, WTA प्रमुख स्टीव्ह सायमन यांची प्रतिक्रिया

महिला टेनिस संघटनेच्या अध्यक्षा स्टीव्ह सायमन यांनी पेंग शायमनने केलेल्या चीनच्या मीडियावरील ईमेलवरील पत्रावरून प्रतिक्रिया दिली आहे

महिला टेनिस संघटनेच्या अध्यक्षा स्टीव्ह सायमन यांनी पेंग शुई यांनी केलेल्या चीनच्या मीडियावरील ईमेलवरील पत्रावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, पेंग शुई यांनी लिहलेले पत्र फक्त तिच्या सुरक्षेबाबत माझी चिंता वाढवत आहे. महिला टेनिस संघटनेच्या अध्यक्षा स्टीव्ह सायमन यांनी एका निवेदनात म्हटले की, “पेंग यांनी लिहलेल्या ईमेलवर विश्वास ठेवणे कठीण आहे. दोन आठवड्यांपूर्वी एका शक्तिशाली चीनी राजकारण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्याचे ऐकले आहे”. पेंग आणि माजी विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन दुहेरी चॅम्पियन यांनी महिन्याच्या सुरूवातीला ट्विटरवरून माहिती देताना म्हटले होते की माजी उप-प्रीमीयर झांग गाओलीने मोठ्या कालावधीपासून तिच्यावर लैगिंकसंबधांसाठी जबरदस्ती केली आहे असा आरोप केला होता.

यानंतर पेंग शुईने केलेले हे धक्कादायक आरोप सोशल मीडियावरून त्वरीत हटवण्यात आले होते. पण तेव्हापासून ती दिसली नाही म्हणून तिच्या आरोग्याबद्दल चिंता वाटत असल्याचे सायमन यांनी म्हटले. अशातच चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने ट्विटरवर एक स्क्रीनशॉट पोस्ट केला ज्यामध्ये पेंगने सायमन आणि इतर महिला टेनिस संघटनेच्या अधिकार्‍यांना लिहिलेला ईमेल होता. त्या ईमेलमध्ये पेंग यांनी दावा केली की, “मी लैगिंक शोषणाचे यापूर्वी केलेले आरोप खरे नाहीत आणि माझे सर्वकाही ठीक असून मी सध्या आराम करत आहे”. मात्र त्या पेंग यांनी केलेल्या ईमेलवरील आरोपांतील भाषेबद्दल शंका उपस्थित करत चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने पोस्ट केलेल्या स्क्रीनसॉटचा दाखला देत हे शंकास्पद असल्याचे ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटले आहे.

तर सायमन यांनी एका निवेदनात म्हटले की, “पेंग शुईच्या संदर्भात आज चीनच्या राज्य मीडियाने केलेले विधान फक्त तिच्या सुरक्षिततेबद्दल आणि ती सध्या कुठे आहे याबाबतीत असून हे सगळे काही माझी चिंता वाढवत आहे”. मला विश्वास ठेवणे कठीण आहे की पेंग शुईने आम्हाला मिळालेला ईमेल खरोखर तिनेच लिहला असेल का. मात्र वारंवार तिच्यापर्यंत अनेक पध्दतीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पण मी ती सुरक्षित असल्याचा खात्री करून घेणार आहे, असे आणखी बोलताना सायमन यांनी म्हटले.

पेंगने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावर तिने मोठे धैर्य दाखवल्याचे सायमन यांनी म्हटले सोबतच त्या आरोपांची सखोल चोकशी करण्याची देखील मागणी यावेळी केली. त्यांनी सांगितले की,”तिच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचा पूर्णत: तपास झाला पाहिजे. आरोपांचा आदर करतानाच सखोल चौकशी केली पाहिजे. महिलांचा आवाज ऐकला पाहिजे त्याचा अनादर केला नाही पाहिजे”. अशी मागणी सायमन यांनी केली.

सायमन यांच्या मागणीवर चायनीज ह्युमन राइट्स डिफेंडर्सच्या वकिलांच्या गटातील विल्यम म्हणाले की पेंगचे विधान हे वादग्रस्त आहे ते मुख्य मूल्यावर घेतले जाऊ नये. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेल्या लोकांना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा आणि त्यांच्या मोकळेपणाने बोलण्याच्या क्षमतेवर नियंत्रण ठेवण्याचा आणि त्यांना जबरदस्तीने विधाने देण्यास चिनी सरकारचा मोठा इतिहास आहे.” तर पेंग शायमन यांना अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही पण हे आरोप सिध्द करण्यासाठी त्यांना बिजींगला बोलवण्यात आले आहे.


हे ही वाचा: WBBL 2021 : स्मृती मंधानाने रचला नवा इतिहास; BBL मध्ये शतक करणारी ठरली पहिली भारतीय महिला