घरक्रीडाDronacharya Award : कुस्तीचा अवमान झाला, गुरूच्या समर्थनार्थ उतरला बजरंग पुनिया

Dronacharya Award : कुस्तीचा अवमान झाला, गुरूच्या समर्थनार्थ उतरला बजरंग पुनिया

Subscribe

क्रिडा विभागाकडून ११ द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या नावांना काढून टाकल्यानंतर कुस्तीच्या प्रशिक्षकांच्या समर्थनार्थ ऑलिम्पिकमधील पदक विजेता पैलवान बजरंग पुनिया उतरला आहे

क्रीडा विभागाने आपल्या अधिकारात सात द्रोणाचार्य आणि चार ध्यानचंद पुरस्कारांची नावे काढून टाकली आहेत. सोबतच यावेळीचा राष्ट्रीय खेलरत्न पुरस्कार चांगल्याच वादात सापडला आहे. क्रिडा विभागाकडून ११ द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस झालेल्या नावांना काढून टाकल्यानंतर कुस्तीच्या प्रशिक्षकांच्या समर्थनार्थ ऑलिम्पिकमधील पदक विजेता पैलवान बजरंग पुनिया उतरला आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की पुरस्कार देण्याबाबत कुस्तीचा अवमान झाला आहे. तर द्रोणाचार्यसाठी ज्या दोन कुस्ती प्रशिक्षकांना वगळण्यात आले आहे ते खूप चुकीचे आहे. कुस्तीच्या प्रशिक्षकांचे नाव नसल्यामुळे मी क्रिडा मंत्र्याची भेट घेणार असल्याचे कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले.

निवड समितीने यादीतून नाव काढल्यानंतर कुस्तीचे प्रशिक्षक जगरूप राठी यांनी म्हटले की, “माझ्यासोबत अन्याय झाला आहे. मी आणखी काही क्रिडा मंत्र्यांना भेटणार आहे”. न्यायाधीश मुकंदरम शर्मा यांच्या नेतृत्वात झालेल्या समितीने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी १७ ध्यानचंद पुरस्कारांच्या यादीची शिफारस करण्यात आली होती. तर क्रिडा विभागाने आपल्या अधिकारात ७ द्रोणाचार्य आणि ४ ध्यानचंद पुरस्कारांची नावे काढून टाकली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे समितीने मंजूर केलेल्या यादीला क्रिडा मंत्रालय मंजूरी देत असते. माहितीनुसार क्रिडा मंत्रालयाने सांगितले की द्रोणाचार्य पुरस्कारासाठी अशा नावांची निवड करण्यात आली आहे ज्यांच्या शिष्यांना याअगोदरच हा पुरस्कार दिला गेला आहे. त्यामुळे पुरस्कारांच्या यादीतून काहींची नावे वगळण्यात आली आहेत.

- Advertisement -

लक्षणीय बाब म्हणजे सध्या निवड झालेल्या पुरस्कारांच्या यादीतील काही नावे वादग्रस्त आहेत. एका प्रशिक्षकाविरोधात कोर्टाने लाखो रूपयांच्या दंडाचा आदेश काढला आहे. तर या प्रशिक्षकाविरोधात काही अपराधाचे गुन्हे देखील चालू आहेत. तरीदेखील क्रिडा मंत्रालयाने याच्यावर काहीही भाष्य न करता त्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड केली आहे. तर एका प्रशिक्षकाविरोधात तर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता.


हे ही वाचा: AUS VS PAK : तब्बल २० वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा; ‘PCB’ कडून वेळापत्रक जाहीर

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -