घरक्रीडाT20 Blast : कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या लबूशेनची टी-२० सामन्यातून माघार

T20 Blast : कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या लबूशेनची टी-२० सामन्यातून माघार

Subscribe

त्याला आणखी काही सामन्यांना मुकावे लागू शकेल.

भारतासह जगभरात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असला तरी कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. याचा परिणाम खेळांवरही होत आहे. मागील काही महिने बहुतांश स्पर्धांचे सामने हे रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना खेळवावे लागत आहेत. तसेच काही ठिकाणी केवळ मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. काही खेळाडूंनाही कोरोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मार्नस लबूशेनने कोरोनाच्या भीतीमुळे एका सामन्यातून माघार घेणे भाग पडले आहे.

संघातील सहकाऱ्याला कोरोनाची बाधा

इंग्लंडमध्ये सध्या टी-२० ब्लास्ट ही स्पर्धा सुरु असून लबूशेन या स्पर्धेत ग्लमोर्गन संघाकडून खेळत आहे. या संघातील निक सेलमन या खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्याला १० दिवस क्वारंटाईन व्हावे लागले आहे. लबूशेन आणि मायकल निसर हे ऑस्ट्रेलियन खेळाडू सेलमनच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या दोघांनाही मिडलसेक्स संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यातून माघार घेणे भाग पडले.

- Advertisement -

ग्लमोर्गनसाठी मोठा धक्का

लबूशेनने यंदाच्या स्पर्धेत ग्लमोर्गनकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे त्याला टी-२० सामन्यातून माघार घ्यावी लागणे हा ग्लमोर्गनसाठी मोठा धक्का आहे. तसेच त्याला आणखी काही सामन्यांना मुकावे लागू शकेल. याचा परिणाम लबूशेनच्या टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघातील निवडीवरही होऊ शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -