घरक्रीडाT20 WC pak vs ind : पाकिस्तानी तरूणीची धोनीकडे अजब मागणी....

T20 WC pak vs ind : पाकिस्तानी तरूणीची धोनीकडे अजब मागणी….

Subscribe

भारत विरूध्द पाकिस्तानच्या लक्षणीय सामन्यासाठी आता अवघे काही तास राहिले आहेत. सर्व चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे, तत्पुर्वी एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २३ ऑक्टोबरचा असून त्यात भारतीय संघाचा मेंटॉर एम.एस.धोनी आणि सलामीचा फलंदाज के.एल.राहुल यांना सामन्यात पराभूत होण्यासाठी खुली ऑफर दिली देण्यात आली आहे. प्रक्षिक्षण झाल्या नंतर दोन्ही खेळाडू हॉटेलकडे जात असताना हा प्रकार घडला, धोनीनेही ह्या प्रकरणावर चांगलेच उत्तर दिले आहे. झालेला प्रकार हा गमतीशीर होता परंतु धोनीने दिलेले उत्तर चर्चेत आलं आहे.

भारतीय संघ प्रशिक्षण झाल्यानंतर हॉटेलमध्ये जात असताना पाकिस्तानची अँकर सवेरा पासा हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होती. तेवढ्यात तिचे लक्ष राहुलवर गेले, त्याला बघताच पाकिस्तानी अँकरने पाकिस्तानविरूध्द चांगली फलंदाजी न करण्याची विनंती केली. “प्लीज उद्या चांगला खेळू नको” तिने हे वक्तव्य अनेकदा रिपीट केलं. त्यावर राहुल फक्त हसला त्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

- Advertisement -

सामना गमवायच्या ऑफरला धोनीने दिले उत्तर

यानंतर पाकिस्तानची अँकर सवेराने आपला मोर्चा धोनीकडे वळवला तिने धोनीला विनंती केली “माही नॉट दिस मॅच प्लीज” तिच्या अशा विनंतीवर धोनीने त्याची प्रतिक्रियी दिली. “हेच तर माझे काम आहे ” अशा शब्दांत धोनीने समीराच्या विनंतीचा आपल्या हटक्या शैलीत समाचार घेतला. धोनीने नाव नाही घेतले पण इशारा पाकिस्तानकडे होता, धोनी ज्या कामाबद्दल बोलत होता ते काम म्हणजे पाकिस्तानला आजच्या सामन्यात धूळ चारणे.

- Advertisement -

हेही वाचा : T20 WC : कर्णधार बाबरची पाकच्या चाहत्यानेच उडवली खिल्ली…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -