घरक्रीडाभव्य-दिव्य आयोजनाची रायगडची परंपरा कायम

भव्य-दिव्य आयोजनाची रायगडची परंपरा कायम

Subscribe

रायगडकर कबड्डीचे चाहते. कब्बडी स्पर्धा म्हटली की रायगडकर वेडे होतात. कोणतीही कबड्डी स्पर्धा असो ती पाहण्यासाठी गर्दी करतात. रायगडमध्ये यापूर्वी ज्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा झाल्या त्यांना रायगडातील कबड्डीशौकिनांनी चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेचे नियोजन देखील उत्तम झाले. भव्य-दिव्य आयोजन ही रायगडची परंपरा आहे. ती परंपरा ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत देखील राखण्यात आली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशमचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, आमदार अनिकेत तटकरे रायगड जिल्हा परिषददेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या कल्पनेतून उत्कृष्ठ नियोजन करण्यात आले आहे. द . ग. तटकरे क्रीडानगरीत चार क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. थंडीचे दिवस असल्यामुळे मॅटवर दवं पडून क्रीडांगणे निसरडी होऊ नयेत यासाठी वर आच्छादन लावण्यात आले आहे, क्रीडांगणे जमिनीपासून दोन फूट वर तयार करण्यात आली आहेत.

- Advertisement -

या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारण्यास कुठलीच राज्य संघटना तयार नव्हती. अशावेळी महाराष्ट्राने ही जबाबदारी स्वीकारली. खरंतर ही स्पर्धा बारामती होणार होती. परंतु, सुनील तटकरे यांनी रोह्यात व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. ती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने मान्य केली आणि स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी त्यांनी आपले पुत्र आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर सोपवली. त्यांच्या साथीला अ‍ॅड. आस्वाद पाटील होते. परंतु अखिल भारतीय कबड्डी महासंघातील वादामुळे इतर संघ या स्पर्धेसाठी येतील किंवा नाही ही चिंता आयोजकांना सतावत होती. सर्व संघांनी येण्याचे मान्य केले. त्यानंतर कामाचा वेग वाढला. अनेक अडचणींवर मात करून कमी कालावधीत या स्पर्ध्येचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय कबड्डी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांनी दाखवलेला विश्वास अ‍ॅड. आस्वाद पाटील आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी सार्थ ठरवला.

या स्पर्धेला सुरुवात होण्यास सुमारे दोन तास उशीर झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष अदिती तटकरे, पार्थ पवार, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, निरीक्षक श्रीमती सुनील डब्बास आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -