घरक्रीडाTokyo Olympics : भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन पदकापासून एक विजय दूर; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Tokyo Olympics : भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेन पदकापासून एक विजय दूर; उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Subscribe

उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकण्यात यश आल्यास लोव्हलिनाला किमान कांस्यपदक मिळणार हे निश्चित होईल.

भारताची बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने ऑलिम्पिकमध्ये दमदार पदार्पण केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील सलामीच्या लढतीत लोव्हलिनाने जर्मनीची अनुभवी बॉक्सर नादीन अपेट्झचे आव्हान परतवून लावले. लोव्हलिनाने हा सामना ३-२ असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यंदा भारताच्या बॉक्सर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात असून आता लोव्हलिना पदकापासून केवळ एक विजय दूर आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकण्यात यश आल्यास तिला किमान कांस्यपदक मिळणार हे निश्चित होईल.

लोव्हलिनाने संयमाने खेळ केला

महिलांच्या ६९ किलो वजनी गटात खेळणाऱ्या लोव्हलिनाने तिच्यापेक्षा वयाने १२ वर्षे मोठ्या असणाऱ्या नादीन अपेट्झचा ३-२ असा पराभव केला. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी अपेट्झ ही जर्मनीची पहिलीच महिला बॉक्सर होती. याआधी तिने जागतिक स्पर्धेत दोनदा कांस्य आणि युरोपियन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे तिला पराभूत करणे २३ वर्षीय लोव्हलिनाला अवघड जाऊ शकेल असे म्हटले जात होते. परंतु, लोव्हलिनाने संयमाने खेळ केला. तिने योग्य वेळी आक्रमण केले. त्यामुळे पाच पैकी तीन पंचांनी सामन्याचा निकाल तिच्या बाजूने दिला.

- Advertisement -

उपांत्यपूर्व फेरीत चेनशी सामना 

जागतिक स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमधील दोन वेळच्या कांस्यपदक विजेत्या लोव्हलिनाचा उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईच्या निन-चीन चेनशी सामना होईल. चेनला टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे सिडींग मिळाले असून तिने याआधी जागतिक स्पर्धा जिंकली आहे. चेनने इटलीच्या अँजेला कॅरिनीचा ३-२ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. चेन आणि लोव्हलिना यांच्यातील सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -