घरक्रीडाकोरोना काळात इंग्लंडमध्ये सराव ठरला फायदेशीर - सिंधू 

कोरोना काळात इंग्लंडमध्ये सराव ठरला फायदेशीर – सिंधू 

Subscribe

सिंधूने अखेरची स्पर्धा मार्चमध्ये खेळली होती.

कोरोना काळात इंग्लंडमध्ये जाऊन सराव करण्याचा निर्णय माझ्यासाठी फायदेशीर ठरल्याचे मत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने व्यक्त केले. सिंधू ऑक्टोबरमध्ये इंग्लंडसाठी रवाना झाला होती आणि तेव्हापासून तो तिथेच बॅडमिंटनचा सराव करत आहे. आता ती दोन थायलंड ओपन स्पर्धांतून बॅडमिंटन कोर्टवर पुनरागमन करणार आहे. पहिली थायलंड ओपन स्पर्धा १२ ते १७ जानेवारी या काळात, तर दुसरी स्पर्धा १९ ते २४ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी सिंधू सज्ज आहे.

कोरोना काळात भारतात खेळांना परवानगी नव्हती. त्यामुळे इंग्लंडमध्ये येऊन सराव करण्याचा माझा निर्णय योग्य होता. इंग्लंडमध्ये आता प्रचंड थंडी असली तरी सराव करताना याचा अडथळा नाही. आता जानेवारीपासून पुन्हा बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा ठरल्याप्रमाणे सुरुवात होईल अशी मला आशा आहे, असे सिंधूने सांगितले. सिंधूने अखेरची स्पर्धा मार्चमध्ये खेळली होती. त्यामुळे ती पुन्हा बॅडमिंटन खेळण्यासाठी आतुर आहे.

- Advertisement -

सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे ती यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेआधी सिंधूचा क्रमवारीत अव्वल पाचमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असणार आहे. २०२१ मधील बॅडमिंटन स्पर्धांची मी आतुरतेने वाटत पाहत आहे. यावर्षी ऑलिम्पिकही पार पडणार आहे. त्यामुळे थायलंड येथे होणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत मी वर्षाची विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहे, असे सिंधू म्हणाली.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -