Viral Video : शाहरुखच्या पठाण गाण्यावर विराट, जाडेजाने धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडचा बादशाह किंग खान शाहरुखचा पठाण हा सिनेमा संपूर्ण देशभरात गाजत आहे. बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ने सर्व रेकॉर्ड मोडले. या सिनेमातील ‘झूमे जो पठाण’ हे गाण्याने तर अक्षरश: सर्वांना वेड लावलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांनी भरमैदानात झूम जो पठाण या गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या आठवड्यात पहिला कसोटी सामना खेळण्यात आला. नागपूर येथे झालेल्या सामन्यात भारताने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या गाण्यावर थिरकताना दिसले. या व्हिडीओत विराट कोहली मनसोक्तपणाने डान्स करताना दिसत आहे. तसेच त्याच्या बाजूला रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज हे देखील खेळाडू उभे होते.

@Asifsrksoldier ट्विटर हँडलवरून विराट आणि जाडेजा यांचा १० सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर स्वत: शाहरूख खानने या व्हिडिओवर आपली खास प्रतिक्रिया दिली आहे. ते माझ्यापेक्षा चांगला डान्स करत आहेत!! विराट आणि जडेजाकडून शिकावं लागेल, असं ट्वीट शाहरूख खानने केलं आहे.

पठाण या सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले असून यशराज फिल्म्स निर्मित आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये या चित्रपटाने सुमारे ९६० कोटींची कमाई केली आहे.


हेही वाचा : WPL Auction: कधी बॉयकट केला, तर कधी मुलगा बनून खेळली, १६ व्या वर्षी भारतीय टीममध्ये एन्ट्री