न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक बदलण्याची शक्यता; ‘या’ माजी खेळाडूच्या नावाची चर्चा

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. (VVS Laxman to coach team India in new Zealand series Rahul Dravid to be rested)

न्यूझीलंडच्या दौऱ्यात अनेक अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच, शिखर धवनकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

कर्णधारप्रमाणे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही विश्रांती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळताना दिसत आहे.

अनुभवी खेळाडूंना विश्रांती

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. हे सर्व खेळाडू टी-20 विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियातून थेट भारतात परतणार आहेत. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ डिसेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे.

टी-20 सामन्याचे वेळापत्रक

  • पहिला टी-20 सामना – शुक्रवार 18 नोव्हेंबर, वेलिंग्टन
  • दुसरा टी-20 सामना – रविवार 20 नोव्हेंबर, माउंट मौनगानुई
  • तिसरा टी-20 सामना – मंगळवार 22 नोव्हेंबर, ऑकलंड

वनडे मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला वनडे सामना – शुक्रवार 25 नोव्हेंबर, ऑकलंड
  • दुसरा वनडे सामना – रविवार 27नोव्हेंबर, हॅमिल्टन
  • तिसरा वनडे सामना – बुधवार 30 नोव्हेंबर, क्राइस्टचर्च

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

टी-20 : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप सिंग, अर्शदीप यादव, , हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

वनडे : शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, के. , अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.


हेही वाचा – भारतीय संघात मोठे बदल होणार; ‘हा’ खेळाडू कर्णधार तर..; सुनील गावस्करांची भविष्यवाणी