Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा World Cup Qualifier : जर्मनीला पराभवाचा धक्का; उत्तर मॅसेडोनियाने केले २-१ असे पराभूत  

World Cup Qualifier : जर्मनीला पराभवाचा धक्का; उत्तर मॅसेडोनियाने केले २-१ असे पराभूत  

जर्मनीचा विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या १७ सामन्यांत हा पहिलाच पराभव ठरला.

Related Story

- Advertisement -

जर्मनीला फिफा विश्वचषक युरोपियन पात्रतेच्या सामन्यात उत्तर मॅसेडोनियाने पराभवाचा धक्का दिला. उत्तर मॅसेडोनियाने हा सामना २-१ असा जिंकला. जर्मनीचा विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या १७ सामन्यांत हा पहिलाच पराभव ठरला. सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना एल्जीफ एल्मासने केलेल्या गोलमुळे उत्तर मॅसेडोनियाला हा सामना जिंकण्यात यश आले. हा उत्तर मॅसेडोनियाचा तीन सामन्यांत दुसरा विजय ठरला. तर जर्मनीचा हा यंदाच्या पात्रता स्पर्धेतील तीन सामन्यांत पहिला पराभव होता.

गोलच्या फारशा संधी नाहीत 

या सामन्यात जर्मनीला सुरुवातीपासूनच बॉलवर ताबा मिळवण्यात यश आले. मात्र, त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. याऊलट मध्यंतराआधी काही सेकंद कर्णधार गोरान पांडेवने गोल करत उत्तर मॅसेडोनियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात जर्मनी संघ दमदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे त्यांना ६३ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली आणि ईल्काय गुंडोगनने या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत जर्मनीला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर मात्र जर्मनीचा खेळ खालावला. याचा फायदा उत्तर मॅसेडोनियाला झाला. ८५ व्या मिनिटाला एल्जीफ एल्मासने गोल करत उत्तर मॅसेडोनियाला हा सामना २-१ असा जिंकवून दिला.

इंग्लंड, इटलीचा विजय

- Advertisement -

दुसरीकडे इंग्लंडने पोलंडला २-१ असे पराभूत केले. इंग्लंडकडून या सामन्यात कर्णधार हॅरी केन आणि हॅरी मग्वायर यांनी गोल केले. तसेच इटलीलाही त्यांचा सामना जिंकण्यात यश आले. स्टेफानो सेन्सी आणि चिरो इमोबिलेच्या गोलमुळे इटलीने लिथुवेनियाचा २-० असा पराभव केला.

- Advertisement -