घरटेक-वेकFlipkartने Walmart India केलं खरेदी

Flipkartने Walmart India केलं खरेदी

Subscribe

भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) ग्रुपने वॉलमार्ट इंडिया (Walmart India) खरेदी केली आहे. फ्लिपकार्टने वॉलमार्ट इंडियामधील १०० भागभांडवल प्राप्त केली आहे. याशिवाय फ्लिपकार्ट एक नवीन डिजीटल मार्केटमध्ये होलसेल देखील आणत आहे. फ्लिपकार्ट वॉलमार्ट इंडियाच्या मजबूत होलसेल क्षमतांचा फायदा घेईल आणि किराणा व एसएसएमईच्या वाढीस चालना देईल. तसेच फ्लिपकार्टच्या निर्णयामुळे कंपनीच्या किराणा व्यवसायाला बळकटी मिळणार आहे.

फ्लिपकार्ट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले की, ‘फ्लिपकार्ट होलसेल लाँचसोबत आम्ही देशभरातील तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि छोट्या व्यवसायात आपली क्षमता वाढवू.’ फ्लिपकार्ट होलसेल युनिट ऑगस्टमध्ये लाँच होईल आणि यामध्ये किराणा आणि फॅशन कॅटेगरीज असेल. वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर अग्रवाल हे सगळे काही सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी कंपनीसबोत राहणार आहे.

- Advertisement -

सुमारे दोन वर्षांपूर्वी वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये १६ अब्ज डॉलर्समध्ये ७७ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. आता फ्लिपकार्टने वॉलमार्ट इंडियाला खरेदी केले आहे. देशातील ई-कॉमर्स क्षेत्रात रिलायन्सची जिओमार्टची वेगाने वाटचाल होत आहे. या दरम्यान फ्लिपकार्टने हा करार केला आहे. फ्लिपकार्टचे होलसेल लाँच झाल्यानंतर जिओमार्ट, उडान, मेट्रो कॅश अँड कॅरी आणि अ‍ॅमेझॉनच्या बी२बी या डिवाइजशी टक्कर होईल आणि यांच्या थेट प्रतिस्पर्धा सुरू होईल. फ्लिपकार्टच्या या निर्णयामुळे किराणा आणि एमएसएमईच्या गरजा भागविण्यास स्थिती बळकट होईल.


हेही वाचा – Asus चा गेमिंग स्मार्टफोन ROG Phone 3 आज भारतात लाँच होणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -