अरे व्वा! Flipkartवर ५० हजारापेक्षा कमी किंमतीत घ्या आयफोन १२

iPhone 12 price in India teased to be under Rs 50,000 during Flipkart Big Billion Days sale
अरे व्वा! Flipkartवर ५० हजारापेक्षा कमी किंमतीत घ्या आयफोन १२

फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये (Flipkart Big Billion Days Sale) ॲपल आयफोन १२ (Apple IPhone 12) ५० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे. ३ ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन्स व्यतिरिक्त अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर सूट देण्यात आली आहे. यादरम्यान एक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्के इस्टेंट डिस्काउंट देण्यात आले आहे.

फ्लिपकार्टने ट्वविटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये आयफोन १२ सेलची किंमतीचा खुलासा केला गेला आहे. व्हिडिओमध्ये फोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये दाखवण्यात आली आहे. याचाच अर्थ फोनवर १६ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

अलीकडेच ॲपल आयफोन १३ सीरिज लाँच झाल्यानंतर कंपनीने आयफोन १२ सीरिजची किंमत कमी केली होती. आयफोन १२ची अधिकृत किंमत ६५ हजार ९०० रुपयांपासून सुरू आहे.

आयफोन १२ मधील फिचर्स

ॲपल आयफोन १२मध्ये ६.१ इंचचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये फ्लॅट ॲल्युमिनियम फ्रेम आणि डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी सेरेमिक शील्ड देण्यात आली आहे. एका हाताने हाताळण्याजोगा अशी आयफोन १२ची साईज आहे. हा फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेटिंगसोबत येतो. यामध्ये A14 बायोनिक प्रोसेसर आणि iOS14चा वापर केला गेला आहे. तुम्ही iOS15मध्ये याला अपग्रेड करू शकता.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये १२ मेगापिक्सलचा वाईड अँगल लेंस आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेंस आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. आयफोन १२ तीन स्टोरेज व्हेरियंट 64GB, 128GB आणि 256GBमध्ये येतो. शिवाय यामध्ये पाच कलर ऑप्शन देण्यात आले आहेत. ब्लॅक, ग्रीन, रेड, ब्लू आणि व्हाइट या कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे.


हेही वाचा – Flipkarts ने लाँच केला पहिला स्मार्टफोन; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स