Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर टेक-वेक Joker virus : जोकरचे 'हे' ८ अ‍ॅप्स तात्काळ करा डिलीट, नाही तर...

Joker virus : जोकरचे ‘हे’ ८ अ‍ॅप्स तात्काळ करा डिलीट, नाही तर फोन हॅक झालाच म्हणून समजा

जोकर मालवेअरने प्रभावीत 'हे' ८ अ‍ॅप्स करा डिलीट

Related Story

- Advertisement -

अनेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्हायरस आणि मालवेअरच्या समस्या सुरु आहेत. यामुळे तुमच्या फोनच्या पर्सनल सिक्युरिटी नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेक स्मार्टफोनमधील अँड्रॉइट अ‍ॅप्समध्ये मालवेअर शिरत आहे. त्यामुळे मालवेअरची समस्या जाणवणाऱ्या Android वापरकर्त्यांची संख्या सतत वाढतेयं. क्विक हील सिक्युरिटी लॅबच्या संशोधकांना मालवेअरमुळे प्रभावित झालेल्या अ‍ॅप्सची नवीन बॅच सापडली आहे. या मालवेअरचे नाव जोकर मालवेअर (Joker virus ) असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या गुगलने हे ८ अ‍ॅप्स आपल्या प्लेस्टोरमधून हटवले आहेत. परंतु अद्यापही काही Android वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप्स असल्याने सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

या मालवेअरच्या माध्यमातून Android वापरकर्त्यांच्या मोबाईलमधील पर्सनल डेटा चोरी केला जातोय. या मालवेअरने आत्तापर्य़ंत ४० हून अधिक Android अ‍ॅप्सना टार्गेट केले आहे. कोडींगसह विविध प्रकारे हा मालवेअर मोबाईलमध्ये शिरकाव करतोय. जोकर या मालवेअरमधून वापरकर्त्यांच्या मोबाईलमधील मेसेज, कॉन्टेक्ट लिस्ट, डिवाइस इन्फो, ओटीपी आणि अधिक डेटा पर्सनल डेटा चोरी केला जात आहे. गुगलने हे अ‍ॅप्स आपल्या प्लेस्टोअरमधून हटवले आहेत. परंतु अ‍ॅप्स हटवल्यानंतरही काही Android वापरकर्त्यांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप्स आहेत. त्यामुळे हे अ‍ॅप्स तसेच फोनमध्ये स्टोर राहत आहेत. जर तुम्ही देखील हे डाउनलोड केले असतील. तर, ते लगेच डिलीट करणे आवश्यक आहे.

जोकर मालवेअरने प्रभावीत ‘हे’ ८ अ‍ॅप्स करा डिलीट

- Advertisement -

Auxiliary Message, Fast Magic SMS, Free CamScanner, Super Message, Element Scanner, Go Messages, Travel Wallpapers आणि Super SMS या Appsचा समावेश आहे. जर यापैकी कोणतेही App तुमच्या मोबाईलमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा.

यापूर्वीही गुगलने जोकर मालवेअर शिरलेल्या Good PDF Scanner, Mint Leaf Message-Your Private Message, Unique Keyboard Fancy Fonts & Free Emoticons, Tangram App Lock, Direct Messenger, Private SMS, One Sentence Translator Multifunctional Translator, Style Photo Collage, Meticulous Scanner, Talent Photo Editor Blur focus, Care Message, Part Message आणि Paper Doc Scanner and Blue Scanner हे Apps डिलीट केले आहेत. तर हे अ‍ॅप्सही वापरकर्त्यांनी फोनमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा.


भाजपमधील अस्वस्थ नेत्यांच्या घरवापसीबाबत निर्णय घ्यावा, अशोक चव्हाण यांचे नाना पटोलेंना आवाहन

- Advertisement -

 

- Advertisement -