घरटेक-वेकसोशल नेटवर्किंग अॅप स्पर्धेत भारतीय 'लाईव्ह.मी' चा बोलबाला

सोशल नेटवर्किंग अॅप स्पर्धेत भारतीय ‘लाईव्ह.मी’ चा बोलबाला

Subscribe

‘लाईव्ह.मी’ हे पहिले भारतीय ब्रॉडकास्टींग आणि सोशल एंगेजमेंट प्लॅटफॉर्म असणारे अॅप सध्या बरेच लोकप्रिय होताना दिसत आहे. या अॅपमध्ये वापरकर्त्यांना आणखी सुविधा देण्याकरीता नवीन पाच श्रेण्या तयार केल्या आहेत. यात लाईव्ह एंटरटेनमेंट, लाईव्ह गेम ऑफ गेमर्स, लाईव्ह लाफ्टर चॅलेंज, लाईव्ह बॉलीवूड, लाईव्ह म्युजिक अशा नव्या श्रेण्याचां समावेश होणार आहे.

‘लाईव्ह.मी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी युकी ही यांनी सांगितले की, “लाईव्ह स्ट्रीमिंग हा सध्याच्या जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सध्या सर्वांना सर्व गोष्टी लाईव्ह पाहायला आवडतात. सर्वजण सध्या आपला आवडता कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची मजा घेताना दिसतात. या सर्वांना आणखी मजा देण्याकरिता आम्ही हे अॅप बनविले आहे आणि यात हे बदल केले आहेत. आमचे मुख्य टार्गेट हे १६ ते ३४ वयातील लोक असून आम्ही त्या दृष्टीने काम करत आहोत”

- Advertisement -

काय आहे ‘लाईव्ह.मी’ ?

लाईव्ह.मी हे एक सोशल अॅप असून यावर लोक आपले वेगवेगळे व्हिडिओ क्लिप टाकत असतात. आपण यावर नवनवीन लोकांना फ्रेडंस बनवून एकत्र व्हिडिओ देखील बनवू शकतो. तसेच आपण टाकलेल्या नृत्याचे किंवा इतर व्हिडिओ लोकांकडून पाहिले जातात जितके जास्तवेळा लोक हे पाहतात आणि लाईक करतात त्यानुसार तुमची लोकप्रियता वाढते. या अॅपमधील क्यिज-बीज सारख्या काही स्पर्धा होतात ज्यात योग्य उत्तरे दिल्यावर आपण कॅश प्राईझ देखील जिंकू शकतो.

सध्या सर्व लाईव्ह

सध्या सर्वांना लाईव्ह गोष्टी बघण्याची सवय झाली आहे. जितक्या गोष्टी लाईव्ह तितका लोकांकडून त्यांना प्रतिसाद मिळतो. लाईव्ह.मी, मुज्यिकली यासारखे नवनवीन अॅप येत आहेत. जे लोकांकडून भरपूर वापरले जात आहेत. याच अॅप्सची आणखी रंगत वाढविण्यासाठी नवनवीन बदल केले जात आहेत.

- Advertisement -

लाईव्ह.मीच्या युजर्सची संख्या १ कोटीपार

या आपला तरुण वयोगटातून जास्त प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. या अॅपच्या युजर्सची संख्या १,३६,२१,५४६ इतकी झाली आहे. या अॅपमध्ये येणारे नवनवीन बदल यामुळे याची लोकप्रियता आणखी वाढत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -