घरटेक-वेकMi Anniversary Sale: ९९९ रुपयांमध्ये Redmi Note 10S खरेदी करण्याची संधी

Mi Anniversary Sale: ९९९ रुपयांमध्ये Redmi Note 10S खरेदी करण्याची संधी

Subscribe

आजपासून एमआय अॅनिव्हरसरी सेलला (Mi Anniversary Sale) सुरुवात झाली आहे. हा सेल शाओमी इंडियाच्या वेबसाइटवर सुरू आहे. यात कंपनीच्या बर्‍याच प्रोडक्ट्सवर खूप चांगल्या ऑफर दिल्या जात आहेत. या सेलमध्ये शाओमीच्या स्मार्टफोन, लॅपटॉप, वेअरेबल्सवर सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये Redmi Note 10S हा स्मार्टफोन ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

कंपनीच्या वेबसाइटवर एमआय अॅनिव्हरसरी सेल २०२१ सुरु झाला आहे. यात Redmi 9A, Mi 10T Pro, Mi 10T सारख्या अनेक शाओमी स्मार्टफोनवर सूट देण्यात येत आहे. याशिवाय Mi True Wireless Earphones 2, Redmi Smart Band, Mi Router 4C सारख्या इतर प्रोडक्ट्सवरही सूट दिली जात आहे. या सेलमध्ये कंपनी MI TV 4A टीव्हीच्या अनेक साईज व्हेरिएंटवर सवलत देत आहे. हा सेल १६ जुलैपर्यंत असणार आहे. अनेक पिरीयॉडिक ऑफर्सही यामध्ये दिल्या जातील. या सेलसाठी विशिष्ट असा वेळ असणार आहे. यामध्ये एक ऑफर आहे pick n choose. दररोज रात्री ८ ते १२ या वेळेत सुरु असेल. यात नमूद केलेल्या प्रोडट्क्सवर विविध सूट देण्यात येणार आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे या सेलमध्ये एक हॉट डील सेक्शन देखील आहे. यात सवलतीच्या दरांसह दररोज सकाळी १० वाजता नवीन प्रोडक्ट्स अपडेट्स केली जातील. सोमवारीचं सांगायचं झाल्यास, शाओमीने Mi Notebook 14 Horizon i5, Mi True Wireless Earphones 2C, Redmi Note 9 सोबत 30000mAh Mi Boost Pro Power Bank ला सूट दिली आहे.

कंपनीने Mi Notebook 14 Horizon आणि Mi Notebook १४ लॅपटॉप्स देखील उपलब्ध आहेत. ९,७७७ रुपयांच्या सवलतीसह ते उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. X99 स्टोअरसह आणखी एक ऑफर दिली जात आहे. ही ऑफर दररोज संध्याकाळी चार वाजता सुरु होईल. या ऑफरमधील सिलेक्ट केलेली प्रोडक्ट्स ९९ रुपये, २९९ रुपये, ४९९ रुपये आणि ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत.

- Advertisement -

शाओमीने म्हटलं आहे की यात फक्त उत्पादने मर्यादित असतील आणि जो पहिला येणार त्याला मिळणार या तत्त्वावर उत्पादने विकली जातील. Redmi Note 10S हा स्मार्टफोन X99 स्टोअर सेलमध्ये फक्त ९९ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. Mi Electric Toothbrush ९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -