घरटेक-वेकमायक्रोमॅक्सचं दमदार पुनरागमन; 48MP कॅमेऱ्यासह लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सचं दमदार पुनरागमन; 48MP कॅमेऱ्यासह लाँच केले दोन बजेट स्मार्टफोन

Subscribe

मायक्रोमॅक्स कंपनी अखेर आज भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पुन्हा परतली आहे. तब्बल २ वर्षानंतर आज ऑनलाईन इव्हेंटचे आयोजन केले होते. कंपनीने आज दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. ही गोन्ही फोन बजेटमध्ये आहेत. IN अशा सीरिजमध्ये फोन लाँच करण्यात आले आहेत. IN NOTE 1 जो मधल्या रेंजमध्ये उपलब्ध असेल. हा फोन रिअलमी आणि रेडमी या दोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आला आहे. तर दुसरा फोन IN 1b हा आहे.

Micromax IN Note 1 आणि IN 1B किंमत

मायक्रोमॅक्स IN Note 1 4GB + 64GB स्टोरेज फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. तर 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर मायक्रोमॅक्स IN 1B 2GB + 32GB स्टोरेज फोनची किंमत ६ हजार ९९९ रुपये आहे. तर 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. हे दोन्ही फोन पांढऱ्या आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहेत.

- Advertisement -

मायक्रोमॅक्स IN Note 1 फोन ६.६७ इंचाचा असणार आहे. त्यामध्ये 1080p LCD पंचहोल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. 4GB + 128GB या व्हेरिएंटमध्ये फोन असणार आहेत. त्याला मायक्रो एसडी कार्डसह वाढवता येणार आहे. IN Note 1 मध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तर 5MP आणि 2MP असे दोन सेंसर्स दिले आहेत. सेल्फिसाठी 13MP चा कॅमेरा दिला आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -