घरमनोरंजन'हाऊसफुल ४' नंतर पुन्हा 'या' चित्रपटात दिसणार अक्षय-कृतीची जोडी

‘हाऊसफुल ४’ नंतर पुन्हा ‘या’ चित्रपटात दिसणार अक्षय-कृतीची जोडी

Subscribe

चित्रपटाच्या पहिल्या लूकमुळे सोशल मीडियावर कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कृती सेनन जानेवारी २०२१ पासून बच्चन पांडे चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. बच्चन पांडे या चित्रपटाचे पोस्टर मागील वर्षीच रिलीज करण्यात आले होते, परंतु चित्रपटाविषयी कोणतीही माहिती सांगण्यात आली नव्हती. यापूर्वी हाऊसफुल ४ मध्ये अक्षय कुमार आणि कृती सेननची जोडी एकत्र दिसली होती. आता पुन्हा हे दोघं एका चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या लूकमुळे सोशल मीडियावर कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. आता या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२१ पासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

चित्रपटाची सुरुवातीची शूटिंग जैसलमेरमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होऊ शकली नाही. या चित्रपटाची शुटिंग सेटवर होणार नसून खऱ्या लोकेशनवर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

New look, new release date. Coming on 22nd January, 2021. In and as #BachchanPandey! #SajidNadiadwala @farhadsamji @kritisanon

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

- Advertisement -

या चित्रपटाचे शूटिंग वेळापत्रक आणखी थोडा लांबणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते वेळापत्रक साधारण ६० दिवसांचे असेल. या दिवसात चित्रपटाचा मुख्य भाग चित्रीत करण्यात येणार आहे. सध्या चित्रपटाच्या शुटिंगचे ठिकाण निश्चित झाले नसून ते आता ठरवले जात आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सेटवर डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -