घरट्रेंडिंगअटलजींचे हिंदीत भाषण आणि UN मध्ये टाळ्यांचा कडकडाट

अटलजींचे हिंदीत भाषण आणि UN मध्ये टाळ्यांचा कडकडाट

Subscribe

१९७७ साली परराष्ट्रमंत्री असताना अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेला गेले होते. तिथे त्यांनी उपस्थितांसमोर हिंदीत भाषण केले. या भाषणाला सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करुन उत्स्फुर्तपणे दाद दिली

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हिंदी भाषेच्या जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तसेच हिंदी भाषेने तिचा एक मोठा प्रचारक गमावला आहे. अटलजींसाठी हिंदी भाषा खूप जिव्हाळ्याची होती. जेव्हा जनता दलचे सरकार होते, तेव्हादेखील त्यांनी त्यांचे भाषेवरील प्रेम दाखवले. जनता दलचे सरकार असताना अटल बिहारी वाजपेयी देशाचे परराष्ट्रमंत्री होते. १९७७ मध्ये अटल बिहारी वाजपेयी संयुक्त राष्ट्र संघाच्या(UN) सभेला गेले होते. तेथे अटल बिहारी वाजपेयी यांची जेव्हा भाषणाची वेळ आली तेव्हा वाजपेयी यांनी त्यांचे भाषण हिंदीत केले. हे साधेसुधे भाषण नव्हते. एखादी सभा जिंकण्यासाठी ज्या प्रकारे भाषण केले जाते अगदी त्या आवेशात वाजपेयी यांनी भाषण केले. अपेक्षेप्रमाणे संयुक्त राष्ट्संघाची सभा वाजपेयी यांनी जिंकली. लोकांवर त्यांच्या भाषणाचा प्रभाव दिसत होता. त्यांच्या या भाषणाचे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

काय संदेश दिला अटलजींनी

अशी पहिलीच वेळ होती की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेसारख्या मोठ्या व्यासपीठावर एका भारतीयाचा आवाज घुमला होता, तोही जगभर. हे भाषण या सभेला आलेल्या लोकांना इतकं आवडलं की, सर्व मान्यवरांनी उभे राहून अटलजींसाठी टाळ्या वाजवल्या. या भाषणात अटलजींनी जगाला ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश दिला. ‘वसुधैव कुटुंबकम’चा अर्थ आहे की, ‘वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी आपल्याला एका कुटुंबाप्रमाणे बांधून ठेवते’. तसेच वाजपेयीजींनी यावेळी मानवाचे मूलभूत अधिकार, तसेच रंगभेद सारख्या गंभीर मुद्द्यांना हात घातला.

- Advertisement -


कवितेद्वारे केले प्रेम हिंदीवर प्रेम

अटल बिहारी वाजपेयी एक मोठे नेते होतेच परंतु ते चांगले कवीदेखील होते. त्यांनी हिंदी भाषेत खूप उत्तमोत्तम कविता रचल्या आहेत. त्यांच्या अनेक हिंदी कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. अनेकांना त्यांच्या कविता वाचण्यासह त्यांच्या आवाजात ऐकायला आवडतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -