Jio फोननंतर आता येणार Jioचा स्मार्टफोन

इकोनॉनिक्स टाईमने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स जीओला सध्या आपला स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी इतर कंपन्याचा शोध घेत आहे. परवडणाऱ्या दरात फोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

reliance_jio_smartphones-1
लवकरच येणार रिलायन्स jioचा स्मार्टफोन

रिलायन्सने गेल्याचवर्षी Jio फोन लॉन्च केला. त्यानंतर यंदाच्यावर्षी JioPhone2 लॉन्च करण्यात आला. पहिल्या फोनपेक्षा अॅडव्हान्स असलेला या फोनला सुद्धा अनेक ग्राहकांची पसंती मिळाली. कारण या नव्या फोनमध्ये व्हॉटसअॅप, फेसबुक आणि गुगल सर्व्हिस सपोर्ट हे काही नवे फिचर या फोनमधून देण्यात आले. पण लुक्सच्या बाबतीत हा फोन तितकासा पसंतीस पडत नसल्यामुळेच आता रिलायन्स लवकरच स्मार्टफोनप्रमाणे मोठी स्र्किन असलेला फोन रिलायन्स लवकरच आणणार आहे, अशी माहिती इकोनॉमिक टाईम्सने दिली आहे.

जरा जपून, ‘या’ पासवर्डवर हॅकर्सची नजर

रिलायन्सला शोध कंपनीचा

इकोनॉनिक्स टाईमने दिलेल्या माहितीनुसार रिलायन्स जीओला सध्या आपला स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी इतर कंपन्याचा शोध घेत आहे. परवडणाऱ्या दरात फोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रिलायन्स जीओचे हेड सेल्स आणि चॅनेल डेव्हलपमेंट सुनिल दत्त यांनी इकोनॉमिक टाईम्सला सांगितले की, रिलायन्सचे उदिष्टय लोकांना परवडणारे फोन देणे हे आहे. सध्याच्या काळात मोठ्या स्क्रिनचे स्मार्टफोन्स लोकांना आवडतात. अजून ज्या लोकांनी 4G वापला नाही अशा लोकांना हा नवा स्मार्टफोन एक वेगळा अनुभव देईल.

शनी’भोवती असलेल्या कडा होतील गायब ?

Jio व्हॉईस सर्व्हिस

jioने वाय- फायवर चालणारी व्हॉईस ओव्हर सेवा मध्यप्रदेशमध्ये सुरु केली आहे. कोणतेही सेल्युलर कनेक्शन नसताना अशा ठिकाणी केवळ वायफायच्या मदतीने फोन करणे शक्य आहे. जीओच नाही तर एअरटेलसुद्धा यावर काम करत आहे. हे vo wifi feature असून घरी असलेल्या हॉटस्पॉट आणि ऑफिसमध्ये बसून तुम्ही कॉल करु शकता,असे हे फिचर आहे.