घरटेक-वेकटाटाची Tiago NRG कार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टाटाची Tiago NRG कार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Subscribe

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (TATA Motors) ने बुधवारी भारतात आपली नवीन क्रॉसओव्हर हॅचबॅक कार TATA Tiago NRG (टाटा टियागो एनआरजी) लाँच केली आहे. TATA Tiago NRG भारतीय कार बाजारात मॅन्यअल आणि ऑटोमेटेड मॅन्यअल या दोन ट्रान्समिशन पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे. TATA Tiago NRG च्या मॅन्यअल ट्रान्समिशन आवृत्तीची एक्स-शोरूम किंमत ६.५७ लाख रुपये आहे. तर ऑटोमेटेड मॅन्यअल ट्रान्समिशन व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत ७.०९ लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा मोटर्सची Tiago NRG ही कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक Tiago वर आधारित क्रॉसओव्हर कार आहे. पण कारच्या एक्सटिरियरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यासह, कारच्या इंटीरियर आणि केबिनमध्येही अपडेट्स करण्यात आले आहेत. ज्यामुळे नवीन टाटा Tiago NRG चा लूक खूप स्पोर्टी दिसत आहे.

- Advertisement -

फिचर्स

टाटा Tiago NRG मध्ये कंपनीने नवीन फ्रंट लुक दिला आहे. यात १४ इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. पॉवर स्टेअरिंग देण्यात आलं आहे. तसंच, अँटी लॉक ब्रेक सिस्टम, पॉवर विंडोज फअरंट,पॅसेंजर्स आणि ड्रायव्हरला एअर बॅग,मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हिल देण्यात आलं आहे.

स्पेसिफिकेशन

Tiago NRG मध्ये 1199cc पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. 84.48bhp एवढी मॅक्सिमम पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करेल.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -