घरटेक-वेकआक्षेपार्ह ट्विट केल्यास आता अकाऊंट होणार बंद

आक्षेपार्ह ट्विट केल्यास आता अकाऊंट होणार बंद

Subscribe

सतत अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन ट्विटर अकाऊंट बंद करण्याची कडक कारवाई करण्याचं पाऊल उचललं आहे.

सध्या सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं सर्वात मोठं व्यासपीठ झालं आहे. मात्र या सोशल मीडियावर अनेकदा आक्षेपार्ह गोष्टींवर व्यक्त झालेलं अथवा काहीही शेअर पोस्ट करण्यात आल्याचं निदर्शनाला येतं. त्यामुळं आता मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरनं १० ऑगस्टपासून लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. सतत अभद्र भाषेचा उपयोग करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन ट्विटर अकाऊंट बंद करण्याची कडक कारवाई करण्याचं पाऊल उचललं आहे.

कडक कारवाई करणार असल्याचे संकेत

पेरिस्कोप ब्लॉगपोस्टनुसार, ‘सुरक्षित सेवा तयार करण्याच्या आमच्या सतत प्रयत्नांना एक भाग म्हणून थेट प्रसारणादरम्यान पाठवलेल्या चॅटविषयी आमच्या मार्गदर्शक तत्त्वांची अधिक आक्रमक अंमलबजावणी करत आहोत,’ असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर पेरस्कोपच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, ट्विटरच्या अशा पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. कोणीही वाईट पोस्ट केल्यास, पेरिस्कोप काही युजर्सना निवडेल. जे युजर्स ही पोस्ट आक्षेपार्ह आहे अथवा नाही याबद्दल आपलं मत सांगतील. १० ऑगस्टपासून सतत रिव्ह्यू करत राहणार असून कोणीही नियमांचं उल्लंघन करत नाही ना? याबद्दल शोध घेण्यात येईल. दरम्यान कोणत्याही व्यक्तीला आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास, अथवा अशा तऱ्हेचं चॅट दिसल्यास, आपल्याला रिपोर्ट करण्याचंही आवाहन करण्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

ट्विटरनं पासवर्ड बदलण्यास सांगितलं

तुम्ही ट्विटरचा वापर करत असल्यास, ट्विटरकडून ३३ कोटी युजर्सना आपला पासवर्ड बदलण्यास सांगितलं आहे. ट्विटरच्या इंटरनल लॉगमध्ये एक एक बग मिळाला असून व्यवस्थित करण्यात आलं आहे. मात्र, यामुळं कोणत्याही युजर्सच्या डेटावर परिणाम झाला नसून अकाऊंट सुरक्षित असल्याचं आश्वासन ट्विटरनं दिलं आहे. तर पासवर्ड बदलण्यास सांगितलं आहे. शिवाय यानंतर अशा प्रकारची कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही ट्विटरनं सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -