घरटेक-वेकVivo Y30 क्वाड रियर कॅमेर्‍यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Vivo Y30 क्वाड रियर कॅमेर्‍यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Subscribe

विवो स्मार्टफोन कंपनीने आपला नविन फोन बाजारात आणला आहे.

विवो स्मार्टफोन कंपनीने वाय सीरीजमधील Vivo Y30 हा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. सध्या विवोने अधिकृत चॅनेलद्वारे हा लाँच केलेला नाही. तथापि, हा मलेशियन ऑनलाइन स्टोअरमध्ये आहे, जिथे त्याची किंमत आणि सिफिकेशन्स सांगण्यात आले आहेत.

Vivo Y30 ची 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 15,800 रुपये आहे. हा स्मार्टफोन डॅझल ब्लू आणि मूनस्टोन व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये येईल. हा ९ मे रोजी मलेशियन बाजारात येऊ शकतो. Vivo Y30 च्या जागतिक लाँचिंगबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

- Advertisement -

Vivo Y30 स्पेसिकेशन्स

ड्यूल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० बेस्ड Funtouch OS वर चालतो आणि यात ६.४७ इंचाचा HD+ (720×1560 पिक्सल) डिस्प्ले आहे. यात ऑक्टा-कोर MediaTek Helio P35 (MT6765) प्रोसेसर 4 जीबी रॅमसह आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूस एक क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 113MPचा आहे. याशिवाय यात 8MPचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, 2MP डेप्थचा कॅमेरा आणि दुसरा 2MP कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Y30 ची अंतर्गत मेमरी 128GB आहे. मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याची बॅटरी 5,000mAh आहे.


हेही वाचा – मोटोरोलाच्या फोल्डेबल फोनची ८ मे पासून विक्री, १० हजाराची कॅशबॅक ऑफर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -