WhatsApp म्हणतं Dont Worry तुमचं चॅटिंग सेफ

पॉलिसीमध्ये बदल झाल्याने तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे', असा दावा कंपनीने केला आहे.

whats app will stop working if you do not working new terms and policy
व्हॉट्स app प्रायव्हसी पॉलिसी

WhatsApp या मेसेजिंग मोबाईल applicationचा वापर जगभरात कोट्यवधी लोकं करत आहेत. त्यामुळे जगभरात WhatsApp हे सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग App बनलं असून सातत्याने युजर्सकडून या applicationचा वापर केला जातो. मात्र, सध्या WhatsAppने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे WhatsApp वर जगभरातून टीका केली जात आहे. परंतु, आता WhatsAppने याबाबत ट्विटर वरुन स्पष्टीकरण दिले आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘पॉलिसीमध्ये बदल झाल्याने तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे’, असा दावा कंपनीने केला आहे.

WhatsAppने दिलं स्पष्टीकरण

WhatsApp या मेसेजिंग Appने स्पष्टीकरण देताना त्यात म्हटलं आहे की, ‘युजर्सचे खासगी मेजेस ही आधीप्रमाणेच १०० टक्के एंड-टू-एंड एनक्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. तुमच्या पॉलिसीमध्ये बदल झाल्याने त्याचा कोणताही परिणाम तुमच्या प्राव्हेट चॅटिंगवर होणार नाही. ही नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे. त्याचप्रमाणे फेसबुक कंपनी WhatsApp युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअर केली जाणार नाही’, असा दावा कंपनीने केला आहे.

WhatsAppच्या नव्या अटी आणि नियमांमुळे WhatsApp यूजर्सनी धसका घेतला आहे. नव्या अटी जाचक असल्यामुळे WhatsApp यूजर्स नवा पर्याय शोधत आहेत. WhatsAppच्या नव्या अटी आणि नियमांमुळे यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येत आहे. त्यामुळे आपल्या प्रायव्हसीला धोका होऊ नये, यासाठी आता WhatsApp यूजर्स नवा पर्याय शोधत असून सिग्नल मेसेंजरकडे (signal massenger) जगभरातील लोकांनी मोर्चा वळवला आहे.

गेले दोन दिवस सिग्नल मेसेंजरवर यूजर्सची संख्या वाढल्याने सिग्नल मेसेंजरवर वेरिफिकेशन कोड उशिरा येतो आहे. या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने यूजर्सला जोडण्यासाठी एक गाईडलाईन जारी केली असून जी दुसऱ्या मेसेंजर अ‍ॅपवरून सिग्नलवर मूव्ह करण्यासाठी स्टेप्स सांगत आहे. WhatsApp ने बुधवारपासून यूजर्सला पॉप-अप मेसेज पाठवायला सुरुवात केली आहे. यात यूजर्सला नियम आणि अटींसह नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगण्यात आलं आहे. WhatsApp चे नवे नियम ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील, अन्यथा युजर्सचं अकाउंट डिलीट केलं जाईल, असं WhatsApp ने सांगितलं आहे.


हेही वाचा – Instagram Reels डाऊनलोड करण्यासाठी ‘या’ खास टिप्सचा करा वापर!