घरटेक-वेक१४ दिवसांच्या बॅटरीसह Xiaomi Mi Band 4C लाँच; जाणून घ्या किंमत!

१४ दिवसांच्या बॅटरीसह Xiaomi Mi Band 4C लाँच; जाणून घ्या किंमत!

Subscribe

एप्रिलमध्ये लाँच झालेल्या Redmi Band चे हे ग्लोबल व्हर्जन

Xiaomi च्या विअरेबल पोर्टफोलियोमध्ये लेटेस्ट Mi Band 4C ची एन्ट्री झाली आहे. एप्रिलमध्ये लाँच झालेल्या Redmi Band चे हे ग्लोबल व्हर्जन आहे. या फिटनेस ट्रॅकरमध्ये रेक्टेंग्युलर कलर डिस्प्ले आणि बिल्ट-इन चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे, जो USB-A मध्ये प्लग करता येतो.

कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा चार्ज केल्यास १४ दिवस ते चालवले जाऊ शकते. तसेच, यामध्ये हार्ट रेट सेन्सर, स्लीप मॉनिटर आणि अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर सारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. हे 5ATM वॉटर-रेसिस्टेंट आहे. यात ब्लूटूथ 5.0LE आहे. तसेच Android आणि iOS डिव्हाइससह जोडला गेला आहे.

- Advertisement -

Mi Band 4C ची किंमत NT$ ४९५ (सुमारे १,३०० रुपये) आणि HK$ १५९ (सुमारे १,६०० रुपये) आहे. तैवान आणि हाँगकाँगमध्ये यापूर्वीच विक्री उपलब्ध सुरू झाली आहे. हा फिटनेस ट्रॅकर काळ्या, नारंगी, हिरव्या आणि निळ्या रंगांच्या स्ट्रॅपसह ग्राहकांना उपलब्ध आहे.

Mi Band 4C मध्ये 2D टेम्पर्ड ग्लास आणि 200nits ब्राइटनेस सह १.०८ -इंच LCD कलर टचस्क्रीन देण्यात आला आहे. हे स्टेप काऊन्ट, हार्ट रेट, एक्टिविटीज, अॅप्स आणि कॉल नोटिफिकेशन डिस्प्ले देखील करतो. यात हार्ट रेट अलर्ट्ससह 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग देण्यात आले आहे.यामध्ये ५ स्पोर्ट्स मोड- एक्सरसाइज, साइकलिंग, आऊटडोर रनिंग, ट्रेडमिल आणि फास्ट वॉकिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. याची बॅटरी 130mAh ची असून याचे वजन साधारण १३ ग्रॅम आहे.


Vivo ने भारतात लाँच केले ट्रू वायरलेस इयरफोन; जाणून घ्या किंमतीसह…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -