घरठाणेरस्त्यामध्ये असलेल्या दिशादर्शक फलकाला ट्रकची धडक; अडीच तासांनी चालकाला बाहेर काढण्यात यश

रस्त्यामध्ये असलेल्या दिशादर्शक फलकाला ट्रकची धडक; अडीच तासांनी चालकाला बाहेर काढण्यात यश

Subscribe

ट्रक चालक मुमताज खान यांचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक रस्त्याच्या मधोमध असलेल्या दिशादर्शक फलकाला जाऊन धडकला. पण सुदैवाने या ट्रकच्या धडकेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

ठाणे: रस्त्याच्या मधोमध असलेल्या दिशादर्शक फलकाला ट्रकची धडक लागून अपघात झाल्याची घटना ठाण्यातील(thane) वागळे इस्टेट येथे घडली. हा ट्रक राजस्थानातील चित्तोरगढ येथून ठाण्यातील वागळे इस्टेट(wagle estate) मधील अंबिका नगर येथे आला होता. या ट्रक मध्ये २५ टन मार्बल होते. ट्रक चालक मुमताज खान यांचा ट्रकवरील ताबा सुटला आणि हा ट्रक रस्त्याच्या मधोमध असलेल्या दिशादर्शक फलकाला जाऊन धडकला. पण सुदैवाने या ट्रकच्या धडकेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हे ही वाचा –  ठाण्यात पाण्याची टाकी फुटली; तब्बल २१ घरांचे नुकसान

- Advertisement -

दरम्यान, ट्रकची(truck hit) झालेली ही धडक फार मोठी होती. दिशादर्शक फलकाला ट्रकची धडक लागल्या नंतर ट्रक चालकाला बाहेर काढण्यासाठी तब्ब्ल दोन तासांचा कालब्धी लागला. या घटनेत चालक मुमताज खान (२४) यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून क्लिनर सहबाज खान (१७) याच्या दोन्ही पायांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

हे ही वाचा – ठाणेकरांना १ ऑगस्टपासून होणार अतिरिक्त पाणीपुरवठा

- Advertisement -

हरियाणा(yaryana), मढीगाव येथील रहिवासी असलेले चालक आणि क्लिनर हे दोघे ट्रक मालक साबीर हुसेन यांच्या ट्रकमध्ये २५ टन मार्बल घेऊन राजस्थान चित्तोरगढ येथून ठाण्यातील वागळे इस्टेट(wagle estate), अंबिका नगर(ambika nagar) येथे निघाले होते. त्यांचा ट्रक घोडबंदर रोड मार्ग जाताना काही मिनिटांतच ट्रकमधील मार्बल दिलेल्या पत्त्यावर पोहोचणार होते तेवढ्यातच ट्रकचालक मुमताज यांचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्याच्या मधोमध असलेल्या दिशादर्शक फलकाला जाऊन जोरात धडकला. या अपघात झाल्याची माहिती कापूरबावडी वाहतुक पोलीस अमित पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली.

हे ही वाचा – वर्तकनगरमधील अनधिकृत दुकानांवर कारवाई

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कापूरबावडी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकला होता. त्या ट्रक चालकाला आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी १- कटर मशीन, ३ क्रेनच्या सहाय्याने ट्रकमधून सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. तर जखमी चालक आणि क्लिनर या दोघांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.तर, अपघातग्रस्त ट्रकला कापूरबावडी पोलिसांच्या(kapurbawadi polis station) मदतीने ३ क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

हे ही वाचा – ठामपाच्या कॉल सेंटरमधून बुस्टर डोससाठी कॉल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -