घरठाणेबनावट प्रमाणपत्राच्या आधारे एसएसटी कॉलेजमध्ये प्रवेश

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे एसएसटी कॉलेजमध्ये प्रवेश

Subscribe

12 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

उल्हासनगर । उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील एसएसटी कॉलेजमध्ये शाळा सोडल्याच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे 12 विद्यार्थ्यानी टीवायसाठी प्रवेश घेतल्याप्रकरणी मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील मोर्या नगरीत असलेले एसएसटी कॉलेज मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येते. या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान या कॉलेजमध्ये 2018 साली 12 विद्यार्थ्यांनी मुंबईच्या संदेश कॉलेजच्या नावाने बनावट शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र बनवले. या बनावट पत्राच्या आधारे एसएसटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या वेळी प्रवेश देताना कॉलेजच्या वतीने प्रमाणपत्राची फेर तपासणी करणे गरजेचे असताना कॉलेजकडून शहानिशा करण्यात आली नाही. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. याविषयी मुंबई विद्यापीठाने प्रमाणपत्रांची पडताळणी केली. त्यानंतर ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.

- Advertisement -

या बाबत विद्यापीठाचे उप कुलसचिव अशोक घुले यांनी त्या 12 विद्यार्थ्यांविषयी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गोत करीत आहेत. या 12 विद्यार्थ्यांपैकी कोणालाही शुक्रवारी उशिरापर्यंत अटक झाली नसल्याची माहिती पडवळ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -