घरठाणेरेल्वेची कामे संथ गतीने, लोकल समस्या कायमच

रेल्वेची कामे संथ गतीने, लोकल समस्या कायमच

Subscribe

प्रवाशांचा दररोज गर्दीतून घुसमटून प्रवास

ठाणे : अमोल कदम
मध्य रेल्वेच्या लोकल समस्या काही केले तरी कमी होताना दिसत नाही.  लोकल प्रवाशांना अद्यापही गर्दी मधून जीव मुठीत घेऊन पुरुष तसेच महिला प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मेल एक्स्प्रेस अद्यापही कल्याण पुढे कसारा मार्गावर धीम्या लोकल मार्गावरून रेल्वे विभाग काढत असल्याने कार्यालयीन वेळेत जाणाऱ्या प्रवाशांना आजही लेटमार्कला सामोरे जावे लागत आहे. कार्यालयीन वेळा बदला असे निवेदन रेल्वे प्रवाशी संघटनांनी देऊन सुद्धा रेल्वे आणि राज्याचे शासन दुर्लक्ष करत असल्याचे प्रवासी सांगत आहे. यामुळे लोकल प्रवाशांचा सुखकर प्रवास कधी होणार? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

कल्याण रेल्वे यार्डाचे काम युद्ध पातळीवर होणे आवश्यक असताना देखील कामाला योग्य ती गती मिळत नाही, यामुळे कल्याण ते कसारा, कर्जत लोकल फेर्यांमध्ये वाढ होत नाही. रेल्वेने वातानुकूलित प्रवास करिता वातानुकूलित लोकल सुरु केल्या पण गर्दीच्या वेळेत या वातानुकूलित लोकल प्रवाशांना त्रास दायक होत आहेत. कल्याण पुढे कसारा मार्गावर मालगाडीमुळे होणाऱ्या सततच्या घटनामुळे लोकल प्रवासीमध्ये प्रचंड संताप रेल्वे प्रवाशांमध्ये दिसत आहे. चिखलोली रेल्वे स्थानकाला मान्यता मिळून देखील कामाला गती नाही, टिटवाळा जवळील गुरवली या ठिकाणी रेल्वे स्थानक होणे आवश्यक आहे. हि देखील प्रवाशांनी मागणी करून देखील याकडे रेल्वे दुर्लक्ष करत आहे. ठाणे- मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्थानक मंजूर होऊन देखील काम संथ गतीने सुरु आहे. ठाणे ते बोरीबंदर अशी धावलेल्या जुन्या रेल्वेच्या इंजिनचे मॉडेल ठाणे रेल्वे स्थानकात ठेवण्यात आले. पण प्रवाशांना त्या इंजिनचा आनंद घेता यावा, अशी सुविधाच त्या ठिकाणी उपलब्द नाही. इंजिन समोर गेट लॉक करून ठेवल्याने युवा पिढीला ते इंजिन जवळून पाहता येत नाही.
कळवा रेल्वे स्थानकातून नवीन कळवा-ऐरोली-पनवेल एल्वेलेटर रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. यामुळे या मार्गामध्ये अडथळा येणाऱ्या झोपड्या तसेच घरांचे पुनर्वसन करण्याचे सुरु झाले आहे. कळवा रेल्वे स्थानकाचा विस्तार सुरु झाला आहे, या स्थानकात अजून दोन नवीन फलाट तयार झाले आहेत. पण ह्या नवीन फलाटांचा ठिकाणी अद्यापही रेल्वे थांबा मिळाला नाही. मध्य रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या जलद लोकलला कळवा रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत. पण अद्यापही रेल्वेचे दुर्लक्ष आहे. या कळवा – ऐरोली लिंक रोड येथील दिघा रेल्वे स्थानकाचे बांधकाम देखील संपूर्ण पने पूर्ण झाले. पण कळवा ते दिघा दरम्यान मार्गावर अद्यापही रेल्वे रुळांचे काम प्रगती पथावर नाही.

- Advertisement -

रेल्वेच्या कित्येक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागले आहे. मागील वर्षी टिटवाळा येथे रेल्वे उशिरा आल्यामुळे प्रवाशांनी आंदोलन केले, बदलापूर येथे देखील प्रवाशांनी आंदोलन केले होते. मुंब्रा आणि कळवा येथील प्रवाशांना सकाळच्या वेळी गर्दीमुळे लोकलमध्ये चढताच येत नसल्याने प्रचंड त्रासाला प्रवाशांना जावे लागत आहे.
फक्त दिवेकरांचा प्रश्न सुटलेला आहे. त्या ठिकाणी जलद रेल्वेला थांबा मिळाला असला तरी त्या जलद रेल्वे मध्ये दिवेकरांना सकाळच्या वेळेत चढता येत नसून दिवा ते मुंबई सीएसएमटी रेल्वे सुरु करावी या मागणीसाठी दिवेकर नागरिक अद्यापही ठाम आहेत. त्यामुळे सर्व रेल्वेच्या सुविधा आंदोलन करून पूर्ण होणार का? असे रेल्वे प्रवाशी सांगत आहेत.

आजही ठाणे ते कसारा आणि कर्जत पर्यंत रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित आहेत. कल्याण ते कर्जत – कसारा मार्गावर मालगाडी वारंवार बंद पडत असल्याने तसेच वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने याच स्थानक दरम्यान वारंवार लोकल प्रवासा दरम्यान अडचणी का येत आहेत? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. यामुळे या मार्गावर लोकलचा खोळंबा झाला तर प्रवाशांना प्रवाशाचे दुसरे साधन देखील नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बळ, होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा बळ याचे कर्मचारी बंदोबस्त करीत असतात. महत्वाची ठाणे, कल्याण, डोंबिवली, दिवा, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, अंबरनाथ, कर्जत, कसारा या स्थानकावर पोलीस बंदोबस्त असतो. परंतु या स्थानकामधील स्थानकांवर तुरळक प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. रात्रीच्या वेळी तर कळवा, मुंब्रा, शहाड या स्थनकावर रात्रीच्या शेवटच्या लोकलकच्या वेळेवर महिला प्रवासी प्रवास करताना पोलीस स्थानक परिसरात नसल्याचे आढळत असल्याने याचा गैरफायदा घेऊन गर्दुल्ल्यापासून महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

- Advertisement -

ठाणे रेल्वे स्थानकांवरती चोवीस तास लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांचा फोज फाटा असतो पण बाकीच्या स्थानकावरती सुरक्षेचा गंबीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा व्यवस्था पुरविण्याकडे दुर्लक्ष झाले असल्यामुळे कळवा रेल्वे स्थानकांवरती मध्य रात्री १२ वाजल्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून जबरदस्तीने चार पाच जनाची टोळी असलेली टवाळकी असलेली मुले प्रवाशांना त्रास देत असल्याचे प्रवासी सांगत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात सरकते जिने वारंवार दहा नंबर फलाटावर बंद पडत आहेत. ह्या स्थानकांवर तीन सरकते जिने ऑपरेटर ची आवश्यकता असताना देखील एकच ऑपरेटर असल्याने ह्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

बारा ऐवजी पंधरा डब्बायची रेल्वे लोकल मुंबई वरून धावणे सुरु झाले असले तरी महिलांसाठी रेल्वे मध्ये सुमारे सातच डब्बे आहेत. त्यामुळे त्या महिला डब्यामध्ये सकाळ, संध्याकाळ गर्दी होत असून महिलांची ग्रुप बाजी होऊन डब्यामध्ये आजही हाणामाऱ्या होत आहेत. त्यामुळे रेल्वेने महिलांसाठी डब्बे वाढविले पाहिजे, तसेच एक महिला पोलीस कर्मचारी सतत या डब्यामध्ये असणे आवश्यक आहे. यासाठी कित्येक वेळा महिला प्रवाशी संघटना पाठपुरावा करत आहेत. सकाळ, संध्याकाळच्या वेळेत महिला, शाळेतील, कॉलेजच्या मुली रेल्वे डब्यात चढताना किंवा उतरताना त्यांच्या जवळचे सामान आजही चोरीला जात आहे. त्या महिला डब्यासमोर महिला रेल्वे पोलीस उभे करा ? असे प्रवाशांच्या तक्रारींवरती कित्येक वेळा रेल्वे प्रवाशी संघटना रेल्वे प्रशासनाला सांगत आहेत, तरी त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्यामध्ये आजही पुरुष फेरीवाले प्रवास करत असल्याने प्रचंड त्रास महिलांना सहन करावा लागत आहे.

रेल्वे अपघात झाला कि, त्या अपघात ग्रस्ताला उपचार करण्यासाठी तात्काळ प्रथमोपचाराची सुविधा सर्व स्थानकावरती आहे, तसेच काही स्थानकांवर रेल्वेचे आरोग्य केंद्र सुरु केले पण अद्यापही मुंब्रा रेल्वे स्थानक येथे आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे. फेरीवाल्यांना रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक हद्दीत बसण्याकरिता मज्जाव घातल्यामुळे प्रवाशांचा प्रवास थोडा का? होईना परंतु गर्दीतून सुटका झाली आहे. पण लोकल डब्यामध्ये अनधिकृत फेरीवाले सामानाची विक्री करत असल्याने आजही प्रवाशांना त्रास कायम आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्थानक परिसर स्वच्छ आणि सुंदर असून आता रेल्वेच्या उपहार ग्रहांमध्ये नागरिकांना खाद्य पदार्थ चांगल्या प्रकारे मिळत आहेत तसेच वॉटर व्हेंडिंग मशीन रेल्वे स्थानक दरम्यान उपलब्ध असल्यामुळे स्टेशन स्वच्छ पाणी देखील स्वच्छ प्रवाशांना मिळत पण सर्व रेल्वे स्थानकावर अद्यापही स्वच्छ पाणी प्रवाशांना मिळत नसल्याचे आढळून आले आहे.

स्थानकांवरच्या तिकीट घरात आजही प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा कायम आहेत. प्रत्येक स्टेशनवरती एटीव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत, परंतू एटीव्हीएम मशीनचे बंद पडण्याचे रडगाणे सुरूच आहेत, त्या मशीन एकदा बंद झाल्या की त्या भंगारात जातील, याकडे रेल्वे अधिकाऱ्यांचे जास्त लक्ष जात असल्याचे दिसत आहे. तसेच दिवा रेल्वे स्थानक येथे रात्रीच्या वेळी पादचारी पुलावरील एटीव्हीएम मशीन बंद करून ठेवण्यात येतात याचा देखील प्रवाशांना होत आहे.
ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा येथील रोजचे प्रवास करणारे प्रवासी ह्यांचे हाल कायम आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकावर कोटीचे उत्पन्न सुरु आहे, रेल्वे प्रशासन रेल्वे सुविधा प्रवाशाना देण्यात आता तत्पर झाली असून योग्य वेळी योग्य सुविधा देण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरु केले आहे. पण लोकल प्रवाशांच्या समस्या कधी सुटणार? हा प्रश्न आजही कायम आहे, ह्याकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल का? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे.

गर्दीमुळे लोकांमधून प्रवासी खाली पडून मृत्यू पावत आहेत. केंद्रातून रेल्वेला अमृतमहोत्सव करीता केंद्रातून पैसे मंजूर झाले, पण जी कामे प्रलंबित आहेत ती पूर्ण होणे आवश्यक आहे, यामध्ये रेल्वेने तिसरी आणि चौथी लाईन,कल्याण- कर्जत, कल्याण- कसारा, पनवेल-कर्जत तसेच कुर्ला – सीएसएमटी मार्गावर पाचवी – सहावी लाईन, कळवा – ऐरोली एल्व्हिटेड मार्ग हि कामे तात्काळ पूर्ण होणे आवश्यक आहे. यामुळे लोकल गर्दीवर नियंत्रण येईल, पण रेल्वे याकडे दुर्लक्ष करत असल्याने याकडे कधी कामे होतील याचा विचार होणे देखील आवश्यक आहे.
– नंदकुमार देशमुख-अध्यक्ष,उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना.

ठाणे- मुलुंड दरम्यान नवीन विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक-

· संपूर्ण ठाणे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला +२ मजली इमारत उभी राहणार आहे हे काम रेल्वे करणार आहे.

· एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे.

· तीन पादचारी पुल असणार आहेत.

· परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होणार.

· स्टेशन इमारती समोर 150 मीटर लांब व 34 मीटर रुंद असा सॅटिस असणार आहे

· 2.5 एकर जागेमध्ये चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे.

· स्टेशनला जोडणाऱ्या 3 मार्गीका,

· पहिली मार्गिका नविन ज्ञानसाधना कॉलेज च्या मागून अप -डाऊन असणार आहेत त्या हायवे पूर्वद्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहेत.

· दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अपडाऊन असणार आहे.

· तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाका मार्गे बाहेर पडणारी अपडाऊन असणार आहे.

· तसेच नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्म वरून सुटणार आहेत. तसेच कर्जत कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्म वरून सुटणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -